Pimpri Crime | थकीत घरभाडे मागण्यासाठी गेलेल्या घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरुन ढकललं, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  Pimpri Crime |आठ महिने थकलेले घर भाडे (House rent) मागण्यासाठी गेलेल्या घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरुन ढकलून देत (pushed from the fourth floor) जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीमध्ये (Pimpri Crime) समोर आला आहे. हा प्रकार सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi police station) हद्दीत 29 ऑगस्ट रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास सुदर्शन नगर पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथे घडला आहे. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

सौरभ सचिन पोरे (Saurabh Pore) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तर विजय पाटोळे (Vijay Patole) त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा साहिल पाटोळे (Sahil Patole) यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न (Attempt murder) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी जखमी सौरभ याचे वडिल सचिन शिवदास पोरे (वय-50 रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील सुदर्शन नगरमध्ये (Sudarshan Nagar) फिर्यादी यांची चार मजली इमारत आहे.
ते स्वत: त्या ठिकाणी राहत असून आरोपी कुटुंब देखील मागील अनेक महिन्यापासून तेथे राहत आहे.
दरम्यान, आठ महिन्याचे घरभाडे थकल्याने दोन दिवसांपूर्वी घरमालकाचा मुलगा सौरभ आणि वडील ते मागण्यासाठी गेले होते.
त्यावेळी त्या दोघांना आरोपींनी चौथ्या मजल्यावरच्या टेरेसवर बोलावले.

 

त्याठिकाणी आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला. याच वादातून आरोपींनी फिर्यादी यांचा मुलगा सौरभ याला चौथ्या मजल्यावरुन खाली ढकलून दिले, असे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेत सौरभ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
फिर्यादी सचिन पोरे यांनी गुरुवारी (दि.2) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pimpri Crime | landlord son was pushed from the fourth floor boy seriously injured filed FIR

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SSY | अवघ्या 250 रुपयात उघडा ‘हे’ खाते, मिळतील 15 लाख, जाणून घ्या कसे?

Pune Shivsena | पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुखपदी आदित्य शिरोडकर

LIC Kanyadaan policy | जर तुम्ही ‘या’ योजनेत जमा केले 130 रूपये तर मॅच्युरिटीनंतर मिळतील पूर्ण 27 लाख; जाणून घ्या कसे?