भाजपच्या नगरसेविकेच्या अंगावर फॉर्च्यूनर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपा नगरसेविका पती सोबत कार मधून जात असताना त्यांच्या गाडीला कट मारला. फॉर्च्यूनर गाडीमधील दोघांनी ‘माझ्या मालकांविरुद्ध पोलिसात तक्रार केली का’ असे म्हणून अश्लील कृत्य करुन फॉर्च्यूनर गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन नगरसेविकेला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास भक्ती शक्ती चौकात घडली.

या प्रकरणी पीडित 47 वर्षीय भाजपा नगरसेविकेने फिर्याद दिली आहे. तर फॉर्च्यूनर गाडीतील एक अनोळखी आणि अशोक काळे (57, रा. कृष्णानगर, चिंचवड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित नगरसेविका आणि त्यांचे पती हे त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी निघाले होते.

भक्ती शक्ति चौकात वळण घेतल्यानंतर फॉर्च्यूनर एमएच 14, जी एस 909 या गाडीने त्यांच्या गाडीला कट मारला. यातील अनोळखी खाली उतरला आणि नगरसेविकेला त्यांच्या कार मधून बाहेर काढून रस्त्यावर ढकलून दिले. तसेच ‘माझ्या मालकांविरुद्ध पोलिसात तक्रार केली का’ असे म्हणून कानाखाली मारली आणि अश्लील कृत्य करत विनयभंग केला. काळे याने गाडी घाल अंगावर म्हणून अश्लील हवभाव केले. त्यानंतर फॉर्च्यूनर गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन नगरसेविकेला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तपास निगडी पोलिस करत आहेत.

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’