Pimpri Crime News | ‘तुमच्या मुलाबरोबर एकाच ताटात जेवलोय’ सांगणार्‍याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील गंठण लांबविले

पिंपरी न्यूज (Pimpri News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – ‘‘तुमच्या मुलाचा मी मित्र आहे. आम्ही दोघे एकाच ताटात जेवलो आहोत, ’’अशी ओळख दाखवून एका चोरट्याने ज्येष्ठ महिला नागरिकाच्या गळ्यातील 70 हजार रुपयांचे गंठण चोरुन (Thief) नेले. याप्रकरणी भोसरीतील (Bhosari) गव्हाणेवस्ती (Gavhanevasti) येथे राहणार्‍या एका 65 वर्षांच्या महिलेने भोसरी पोलिसांकडे (Bhosari Police) फिर्याद दिली आहे. ही घटना गव्हाणेवस्तीतील (Gavhanevasti) भारत माता चौकातील बालाजी जनरल स्टोअर (Balaji General Store) या दुकानात मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. Pimpri Crime News | chain snatching at gavhanevasti of bhosari in pimpri-chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या महिला दुकानात असताना दोघे जण मोटारसायकलवरुन आले. त्यांनी या महिलेला ‘‘मी तुमच्या मुलाचा मित्र असून मी भाजीवाल्याचा मुलगा आहे. आम्ही दोघे एका ताटात जेवलो आहोत’’ असे सांगून ओळख काढली. मला तुमच्या गळ्यातील गंठण सारखेच गंठण माझ्या आईला करायचे असे म्हणून तसेच मला तुमच्या गळ्यातल्या गंठणची डिझाईन पहायची आहे, जरा गंठण मला दाखवा असे म्हणून त्याने फिर्यादी यांच्याकडे असलेले ७० हजार ६०० रुपयांचे सोन्याचे गंठण देण्यास भाग पाडले. त्यानंतर तो साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून पळून गेला. भोसरी पोलिस ठाण्यातील (Bhosari Police Station) पोलिस अधिकारी व कर्मचारी (Police Officer and Staff) अधिक तपास करत आहेत.

Web Title :- Pimpri Crime News | chain snatching at gavhanevasti of bhosari in pimpri-chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नगरमध्ये महापौर, उपमहापौर निवडीपूर्वीच शिवसेनेत ‘राडा’ ! दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द

Pune Crime News | बुधवार पेठेतील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा पर्दाफाश; सत्य आलं समोर

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू