पिंपरी : शेतातील खड्ड्यात स्त्री जातीचं अर्भक सापडल्यानं प्रचंड खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलइन – हिंजवडी आयटी पार्क पासून जवळ असलेल्या माण येथील मुळा नदीच्या किनारी धक्कादायक घटना घडली आहे. शेतात खड्डा खोदून त्यामध्ये सात दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक पुरले आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. या प्रकरणी मोहन आनंदा राक्षे (35, रा. राक्षे वस्ती, माण, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राक्षे यांची माण गावात मुळा नदीच्या किनारी शेती आहे. 10 जानेवारी रोजी ते त्यांच्या शेतावर गेले होते. त्यानंतर, गुरुवारी (दि. 16) सकाळी आठच्या सुमारास शेतीला पाणी देण्यासाठी ते शेतावर गेले. नदीच्या किनारी जाऊन पाण्याचा पंप सुरु करत असताना त्यांना त्यांच्या शेतात जमीन खोदलेली आढळून आली.

राक्षे यांनी खोदलेल्या जमिनीच्या भागाची पाहणी केली असता तिथे जमीन खोदून त्यामध्ये पांढ-या कापडात काहीतरी असल्याचे आढळले. त्यावर अज्ञातांनी झाडाच्या फांद्या आणि काटेकुटे टाकले होते. राक्षे यांनी झाडाच्या फांद्या आणि काटेकुटे बाजूला करून जमीन पुन्हा खोदून पांढरे कापड बाहेर काढले असता त्यामध्ये सात ते आठ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्यांनी तात्काळ हिंजवडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like