पिंपरी : गवळीमाथा येथे गोळीबार करुन एकाला लुटले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – भोसरी, एमआयडीसी परिसरातील सराईत गुन्हेगार असणाऱ्याने भर दिवसा गवळी माथा येथे गोळीबार करुन लुटले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असून स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. मात्र संबंधीताने अद्याप पोलिसांकडे तक्रार केली नाही.

न्यान्या लांडगे हा सराईत आरोपी आहे. तो मागील महिन्यात कारागृहातुन सुटला आहे. आज मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास तो भोसरी येथील गवळी माथा येथे गेला. त्या ठिकाणी दहशत माजविण्यासाठी त्याने हातातील पिस्तूल मधून फायरिंग केले. तसेच एकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली. त्याच्या सोबत आणखी काही जण असल्याचे समजते आहे. स्थानिक एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. पोलीस घटनेची माहिती आणि चौकशी करत आहेत. अद्याप कोणताच गुन्हा दाखल झालेला नाही.