क्राईम स्टोरीपिंपरी-चिंचवड

पिंपरी : पोटात चाकू भोसकून तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून एका तरुणाच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना विठ्ठलनगर येथे शुक्रवारी रात्री घडली आहे.

श्याम किसन खंडागळे (२८, रा.विठ्ठल नगर झोपडपट्टी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी करण रमेश धूरंदरे (२२, रा. जय हनुमान सोसायटी, विठ्ठलनगर, नेहरुनगर) यांनी पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण धुरंदरे व अभिजित प्रल्हाद शेळके, सुरज दिनेश जावळे व मयत श्याम किसन खंडागळे हे शुक्रवारी रात्री साडे आकराच्या सुमारास विठ्ठलनगर झोपडपट्टीतून जात होते. आरोपीने दगड्या उर्फ अनिकेत जाधव याने मयत श्याम खंडागळे यास एक सिगरेट घेऊन ये असे सांगितले. तेव्हा श्याम खंडागळे याने तू कोणाला सांगतो सिगारेट आणायला सांगतो…माझे वय काय तुझे वय काय… तू तुझा जा असे सांगितले. यावेळी दगड्याने श्याम खंडागळे याला श्रीमुखात भडकावली. श्याम ने त्याला ढकलून दिले.

यावेळी दगड्या हा ससाणे चाळीतून पळून जावून त्याने आपले साथीदार आकाश खरात (२२, रा. खंडेवस्ती, भोसरी) विजय सावंत (२० रा. खंडेवस्ती भोसरी), एक अल्पवयीन साथीदारांसह ससाणे चाळ, विठ्ठलनगर झोपडपट्टी याठिकाणी श्याम खंडागळे याला गाठून यातील एका अल्पवयीन आरोपीने खंडाळ्याच्या पोटात चाकू भोसकला तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारून श्याम याला गंभीर जखमी केले. यानंतर घटनास्थळावरून आरोपी पसार झाले. श्यामला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, रामचंद्र जाधव, पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Back to top button