Pimpri News : अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर छापा; 8 जणांविरुद्ध FIR

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, 1 लाख 835 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी जुगार अड्डा चालवणाऱ्यासह त्याच्या इतर 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुनील राजेंद्र मोरे (वय 38, रा. निराधारनगर, पिंपरी) असे जुगार अड्डा चालवणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सात साथीदारांविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.7) रात्री सातच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील निराधारनगरमध्ये आंदर-बाहर हा जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई करण्यात आली. या कारवाईत 46 हजार रुपयांची रोख रक्कम, 54 हजारांचे सहा मोबाईल, 25 हजार रुपयांचे पत्त्याचे कॅट असा एकूण 1 लाख 835 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे आर. आर. पाटील, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे, पोलीस हवालदार सुनील शिरसाठ, पोलीस नाईक भगवंता मुठे, नितीन लोंढे, अनिल महाजन, अमोल शिंदे महिला पोलीस नाईक वैष्णवी गावडे, पोलीस शिपाई गणेश करोटे, मारुती करचुंडे, योगेश तिडके यांच्या पथकाने केली.