Pimpri News | पकडायला आलेल्या पोलिसांना तडीपार गुंडाची धक्काबुक्की

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – तडीपार केले असतानाही पिंपरी Pimpri चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तडीपार गुंडाने धक्काबुक्की केली. विरेंद्र ऊर्फ बैंद्या भोलेनाथ सोनी (वय २२, रा. चिंचवडे कॉलनी, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) याला चिंचवड Pimpri पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार स्वप्निल भरत शेलार यांनी चिंचवड Pimpri पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

विरेंद्र सोनी याला या वर्षी परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्तांनी २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. असे असताना तो चिंचवडे कॉलनीत आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस त्याला पकडायला गेले असताना त्याने शेलार यांना धककाबुक्की करुन दोन्ही हाताने ढकलून जमिनीवर खाली पाडले. विरेंद्र सोनी याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

Also Read This : 

Love is Blind | 3 लेकरांची आई असलेल्या काकीचं भाच्यावर जडलं ‘प्रेम’, ‘मज्जा’ करण्यासाठी गेली पळून पण…

 

रात्री ब्रा घालुन झोपणं सुरक्षित आहे का?

 

खंडाळा : वीर धरणाच्या परिसरात ‘पार्टी’ करत हवेत ‘गोळीबार’ ! बारामती, इंदापूर, पुरंदरमधील 9 तरूण ‘गोत्यात’, सातार्‍यासह पुणे जिल्हयात प्रचंड खळबळ
खंडाळा : Khandala – खंडाळा Khandala तालुक्यातील तोंडल या वीर धरणालगतच्या गावात मद्यपान पार्टीचे आयोजन करुन मद्यधुंद झालेल्या तरुणांना आपला दरारा दाखविण्याची खुमखुमी चांगलीच अंगलट आली़ पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर आणि सातारा जिल्ह्यातील ९ तरुणांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे सातार्‍यासह पुणे जिल्ह्यात Pune district चांगलीच खळबळ उडाली आहे.

किरण देविदास निगडे (वय ४६, रा. गुळुंचे, ता. पुरंदर), सूर्यकांत चंद्रकांत साळुंखे (वय २८, रा. कानिफनाथवस्ती, भादे, ता. खंडाळा), नवनाथ बबन गाडे (वय ३४, रा. चोपडज, पो. करंजे, ता. बारामती), माधव अरविंद जगताप (वय ३२, रा. करंजे , ता. बारामती), तात्याराम अर्जुन बनसोडे (वय ३८, रा. अंथुर्णे, ता. इंदापूर), विजय ज्ञानदेव साळुंखे (वय ३९, रा. करंजे, ता. बारामती), योगेश प्रकाश रणवरे (वय ४२, रा. राख, ता. पुरंदर), वसंत नामदेव पवार (वय ४७, रा. कोळविहीरे, ता. पुरंदर) आणि अरविंद घनश्याम बोदेले (वय ४१, रा. लवथळेश्वर, जेजुरी, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील हे तरुण दोन कारमधून वीर धरणालगतच्या गावात आले होते.

तेथे त्यांनी मद्यपान करीत पार्टी केली. मद्यधुंद झालेल्या या तरुणांना आपला दरारा दाखविण्याची खुमखुमी आली.

किरण निगडे याने स्वत: दहशत पसरविण्याच्या उद्देशाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला.

त्यानंतर त्याने हे रिव्हॉल्व्हर योगेश रणवरे याच्याकडे दिले. त्यानेही हवेत गोळीबार केला.

वीर धरणाच्या शांत परिसरात या गोळीबाराचे आवाज लांबवर घुमले. याची माहिती शिरवळ पोलिसांना मिळाली.

त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या.

त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर, दोन कार, मोबाईल असा माल जप्त केला आहे.

हे रिव्हाल्व्हर किरण निगडे याच्या मालकीचे आहे. मात्र, त्याची शासनाच्या परवान्याची मुदत संपली आहे.