गुन्हे शाखेकडून वाहन चोरट्यास अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केलेल्या चोरट्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

रामस्वरूप बिश्वनाथ तिवारी (45, रा. बाग न्यू कॉलनी मालविनगर चौराह, लखनऊ, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस कर्मचारी नामदेव कापसे आणि शिवानंद स्वामी यांना 27 जानेवारी रोजी माहिती मिळाली की, चिखली परिसरातून दुचाकी चोरणारा एकजण दुचाकीसह चिखली परिसरात येणार आहे.

पोलिसांनी सापळा रचून आरोपी रामस्वरूप याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल जप्त केली. पुढील कारवाईसाठी त्याला चिखली पोलिसांकडे देण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like