मौज मजेसाठी वाहन चोरणाऱ्याकडून 5 दुचाकी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मौज-मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास चिंचवड पोलिसांकडून अटक करुन त्याच्याकडून दिड लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.

चिंचवड पोलिस ठाणे तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी हे हद्दीत अ‍ॅन्टी गुंडा कारवाई करत होते. त्यावेळी बिर्ला हाॅस्पीटलकडून वाल्हेकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नंबर प्लेट नसणारी संशयित दुचाकी पोलिसांनी अडवली. चालकाला कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास पोलिस ठाण्यात आणून गाडीच्या चेसी नंबरवरून मुळ गाडी नंबर काढला असता तो MH14FU9520 असा मिळाला. सदर गाडी ही चोरलेली असून त्याबाबत चिंचवड पोलिस ठाणे येथे गु. र. नं. 26/2020 भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी सुरज शिवाजी भालेराव (20, रा.सर्जा लाॅजचे पाठीमागे, डांगे चौक, पुणे, मुळ गाव आशा निवास बिल्डींग, मंचर, ता.आंबेगाव,पुणे) याला अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरून त्या फिरवण्यासाठी व मौज-मजा करण्यासाठी वापरल्याचे कबूल केले.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक निरीक्षक अभिजित जाधव, हवालदार जगताप, पाटील, आखाडे, माने, डोके, राठोड, रूद्राक्षे यांनी केली आहे.