Pimpri Restaurant and Bar | पिंपरीतील रहाटणी येथील ‘स्पॉट-18’ आणि ‘योलो’ बार अँड रेस्टोवर पोलिसांचा छापा, 218 जणांवर कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करुन रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या दोन हॉटेलवर (Pimpri Restaurant and Bar) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी छापा (Police Raid) टाकला. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन हॉटेल्सवर (Pimpri Restaurant and Bar) केलेल्या या कारवाईमध्ये 218 जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून रोकड व इतर साहित्या जप्त केले आहे. रहाटणी येथील जगताप डेरी चौकातील स्पॉट-18 (Spot 18 Pune) आणि ‘योलो’ बार अँड रेस्टो (Yolo Bar & Restaurant) येथे ही कारवाई केली. तसेच विनामास्क 105 ग्राहकांवर कारवाई करुन 52 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज नेवाळे आणि इतर आरोपींनी 18 डिग्रीज बार अँड लवून हा बार रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवला. यामुळे या ठिकाणी ग्राहकांनी गर्दी केली होती. आरोपी आणि ग्राहकांनी कोरोना निर्बंधाचे (corona restriction) उल्लंघन केले. यासंदर्भात माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा पथकाच्या (Social Security Squad) पोलिसांनी छापा टाकून 1 लाख 400 रुपये रोख रक्कम जप्त केली.

सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी योलो बार अँड रेस्टोचा मालक समीर वाघज याच्यासह 9 जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला. तसेच विनामास्क प्रकणी 113 जणांविरोधात कारवाई करुन त्यांच्याकडून 56 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. योलो बार रेस्टॉ या हॉटेलवर छापा टाकून त्यांच्याकडून 74 हजार 220 रुपये जप्त केले.

सहायक पोलीस आयुक्त आनंद भोईटे (Assistant Commissioner of Police Anand
Bhoite) यांनी सांगितले की, रात्री दहापर्यंत हॉटेल सुरु ठेवण्याची परवानगी असतानाही आरोपींनी
हॉटेल रात्री साडेअकरा ते बारापर्यंत सुरु ठेवले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून
त्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करणार आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | जेवणाच्या थाळीवरील ऑफर पडली दीड लाखाला; शहरातील नामांकित डायनिंग हॉलचे बनावट नंबर Google वर

Pradhan Mantri Mudra Yojana | PNB देतंय 50 हजार ते 10 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसे आणि कोण घेऊ शकतो लाभ; जाणून घ्या


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri Restaurant and Bar | pimpri chinchwad police raids two hotels pimpri continue latenight action against 218 persons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update