पिस्तूलाच्या धाकने सराफी दुकानात लुटमार

सराफाने केला चोरट्याशी सामना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन ज्वेलर्स दुकानात आलेल्या दोघांनी पिस्तूलाचा धाक दाखवून दागिने असणारा ट्रे चोरुन नेला. हा प्रकार निगडी येथील सचिन ज्वेलर्स मध्ये शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. यावेळी सराफाने चोरट्याशी सामना केल्याने चोरटे पसार झाले.

पोलिसाकडून मिळाली प्राथमिक माहिती अशी की, निगडी गावठाण मध्ये सचिन ओसवाल यांचे सचिन ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. नेहमी प्रमाणे आज सकाळी त्यांनी दुकान उघडले होते. दोनच्या सुमारास दोघे दुकानात आले. सोन्याचे दागिने दाखवण्यात सचिन यांना गुंतवले. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने दाखवायला लावले.

सराफ सचिन यांनी दाखवलेले दागिने ट्रे मध्ये आल्यानंतर चोरट्यानी त्यांच्या जवळील पिस्तुल त्यांच्यावर रोखले. व दागिन्यांच्या ट्रे घेऊन पळ काढला. यावेळी सचिन यांनी प्रसंगावर्धन राखत दुकानातील लोखंडी रॉड घेतला आणि चोरट्यांना मारला, यावेळी ट्रे मधील काहीसे दागिने खाली पडले. सचिन यांनी लोखंडी रॉडने चोरट्याना मारल्याने त्यांनी पळ काढला. निगडी पोलीस तसेच गुन्हे शाखेची पथके शोध घेत आहेत. मात्र भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे व्यापारी वर्गात मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.