PM Awas Yojana | पीएम आवास योजनेंतर्गत मिळणार तिप्पट जादा रक्कम ?; जाणून घ्या मोदी सरकारचा प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) ही एक सरकारी योजना आहे. ज्याचे ध्येय समाजातील दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हे आहे. ही योजना केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) 2015 साली लाँच केली आहे. दरम्यान या योजनेबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सरकार प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याच्या विचारात आहे. यानुसार आताच्या रकमेच्या तुलनेत तिप्पट अधिक पैसे मिळणार आहेत.

 

पीएम आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) घर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अर्थात आधीच्या तिप्पट रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे.
आता घरे बांधण्याचा खर्च वाढल्याचे समितीने म्हटले आहे.
अशा परिस्थितीमध्ये आता रक्कम देखील वाढवायला हवी.
जर हा प्रस्ताव मान्य झाला तर नागरीकांना या योजनेंतर्गत पूर्वीपेक्षा तीन पट जास्त पैसे मिळतील.
दरम्यान, याआधी झारखंड विधानसभेच्या अंदाज समितीने राज्यात पीएम आवास योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी 4 लाख रुपये देण्याची शिफारस केली होती. समितीचे अध्यक्ष दीपक बिरुआ (Deepak Birua) यांनी पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंदाज समितीचा अहवाल सभागृहासमोर ठेवला.

”प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे.
प्रत्यक्षात वाळू, सिमेंट, रॉड, विटा, गिट्टी यांच्या भाववाढीमुळे ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किमती वाढल्या आहेत.”
त्याचबरोबर ”बीपीएल कुटुंबे 50 हजार ते 1 लाख रुपये देऊ शकत नाहीत,
अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या (Central And State Governments) मदतीने सुरू असलेल्या पीएम आवास योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरांची किंमत 1.20 लाखांवरून 4 लाख रुपये करण्यात यावी,
जेणेकरून घरे प्रत्यक्ष बांधता येतील,” असं दीपक बिरुआ यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- PM Awas Yojana | pm awas yojana you can get three times more amount to build a house under pm awas yojana see details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा