PM Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PM Awas Yojana | प्रत्येकाला राहण्यासाठी घर मिळाले पाहिजे, ही राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील (PM Awas Yojana) उर्वरित घरकुले पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य राहील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री महाजन बोलत होते. (PM Awas Yojana)

ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2024 पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची योजना जाहीर केली. त्या अनुषंगाने राज्य शासनाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्य शासनाला 14 लाख 18 हजार 78 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 14 लाख 16 हजार 23 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. उर्वरित 2055 घरकुलांना मंजुरीची प्रक्रिया सुरु असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

राज्यात आतापर्यंत 99 लाख 3 हजार 791 घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. घरकुलांसाठी जागा उपलब्ध करणे, घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे आदी माध्यमातून घरकुले बांधण्याच्या कामाला वेग देण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात मंजूर झालेल्या घरकुलासाठी उपोषणास बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र,
घरकुलासाठी मंजूर झालेली जागा इतर प्रयोजनासाठी असल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांना
दुसऱ्या जागेवर घरकुलास मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने
त्यांच्या कुटुंबियांना घरकुल देण्याचा निर्णय घेतला. मात्र, याप्रकरणी इतर काहीजण न्यायालयात गेल्याने सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी सदस्य राम शिंदे (MLA Ram Shinde), मनिषा कायंदे (Manisha Kayande),
एकनाथ खडसे (Eknath Khadse), रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil),
जयंत पाटील (Jayant Patil) आदी सदस्यांनी उपप्रश्न विचारले. त्यालाही मंत्री महाजन यांनी उत्तर दिले.

Web Title : PM Awas Yojana | State Government’s priority to complete
houses under Pradhan Mantri Awas Yojana – Rural Development
Minister Girish Mahajan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Election Commission | उद्धव ठाकरेंकडून ‘धनुष्यबाण’ काढून घेतल्यानंतर आता निवडणूक आयोग शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत, रष्ट्रवादीच्या ‘घड्याळ्या’बाबत मोठा निर्णय!

CM Eknath Shinde On Gudi Padwa | महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Mahavitaran News | पुणे परिमंडलामध्ये 40 हजारांवर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित; वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करा – महावितरणचे आवाहन