PM Kisan योजनेच्या 11व्या हप्त्यापूर्वी या शेतकर्यांसाठी खुशखबर, खात्यात येणार आहेत 2000 रुपये
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | शेतकर्यांना 10 वा हप्ता 1 जानेवारी रोजी देण्यात आला होता. आता होळीनंतर अकराव्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात येणे अपेक्षित आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील काही शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेंतर्गत या शेतकर्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार आहेत. (PM Kisan)
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मितौली तहसीलमधील 9379 शेतकर्यांना होळीच्या दिवशी किसान सन्मान निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण मितौली तालुक्यातील अत्रौली ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या सुमारे 14 गावांतील शेतकर्यांना सन्मान निधी मिळत नव्हता. पण डीएम महेंद्र बहादूर सिंह यांच्या प्रयत्नाने आता या गावांतील शेतकर्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार आहेत. (PM Kisan)
काय होते कारण
लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मितौली तहसील नवीन होते, त्यामुळे ते पीएम पोर्टलवर दिसत नव्हते. त्यामुळे शेतकर्यांना नोंदणी करता आली नाही. तसेच पडताळणीची प्रक्रियाही पूर्ण होत नव्हती. या शेतकर्यांना सन्मान निधी मिळावा यासाठी डीएम महेंद्र बहादूर सिंह यांनी राज्य आणि केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर पोर्टलवर तहसिलची नोंदणी करण्यात आली आहे. आता या शेतकर्यांना सन्मान निधी मिळणार आहे.
—
अर्ज करताच मिळेल रक्कम
या चौदा गावांतील नऊ हजार 379 शेतकर्यांना सन्मान निधीचे पैसे मिळालेले नाहीत.
म्हणजेच जे शेतकरी आता अर्ज करत आहेत त्यांना 11 व्या हप्त्यासोबत आणखी 2,000 रुपये दिले जातील.
त्याचबरोबर जिल्ह्यातील 6 लाख 40 हजार शेतकर्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
मिळेल योजनेचा लाभ
आता पोर्टलवर इतर तहसील प्रमाणे मितौली तहसील देखील दिसेल.
ज्या शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही आणि जे पात्र आहेत, त्यांनी कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करावेत,
असे डीएम यांनी सांगितले. तपासणीनंतर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
Web Title :- PM Kisan | good news for these farmers before the 11th installment of pm kisan yojana 2000 rupees are coming in bank account
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update