PM-Kisan New Rules | ‘पीएम शेतकरी सन्मान निधी योजने’च्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  PM-Kisan New Rules | केंद्रातील मोदी सरकारने (Modi government) अनेक वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. त्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (PM-Kisan New Rules) आणली गेली. या योजनेअंतर्गत वर्षाला 3 हप्त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते. अनेक दिवसांपासून या योजनेच्या माध्यमातुन अनेक शेतक-यांनी याचा लाभ घेतला आहे. दरम्यान पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत सरकारकडून एक मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेच्या पोर्टलवर रेशन कार्ड (Ration card) क्रमांक दाखल केल्यानंतरच आता शेतकरी पती अथवा पत्नी दोघांपैकी एकाला पीएम शेतकरी सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे.

 

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या (PM-Kisan New Rules) नोंदणीसाठी एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे.
तो म्हणजे रेशन कार्ड हे आहे. आता रेशन कार्ड बंधणकारक असणार आहे.
तसेच रेशन कार्डच्या अनिवार्यतेसोबत अन्य कागदपत्रांची सॉफ्टकॉपी पोर्टलवर अपलोड करता येणार आहे.
या योजनेत केलेला बदल याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

 

या योजनेसाठी नोंदणीच्या नवीन प्रणाली अंतर्गत, यापुढे रेशन कार्ड (Ration card) क्रमांकाशिवाय नोंदणी करणे शक्य होणार नाही.
तसेच, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची हार्डकॉपी जमा करण्याची आवश्यकता नसणार आहे.
आता पोर्टलवर कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून अपलोड करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे.
आणि नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (pm kisan samman nidhi) योजनेचा आगामी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची योजना आखत आहे.
सरकारने गतवर्षी या कालावधीत हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता.
तर, केंद्र सरकार (Central Government) पीएम शेतकरी (PM-Kisan) सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत दुप्पट करण्याचा विचारात आहे.
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांऐवजी 4 हजार रुपये येण्याची शक्यता आहे.
पंरतु मोदी सरकारने याबाबत अजुन कोणती देखील घोषणा केलेली नाही. असं मिडियाच्या अहवालानुसार माहिती आहे.

 

31 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करा, मिळणार 4 हजार रुपये –

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत नोंदणी (PM-Kisan New Rules) करण्याची संधी आहे.
जर तुम्ही आता अर्ज केला आणि तो अर्ज स्वीकारला गेला तर तुम्हाला नोव्हेंबरमध्ये 2 हजार रुपये आणि डिसेंबरमध्ये 2 हजार रुपये मिळतील.
अशाप्रकारे तुम्हाला 4 हजार रुपये मिळू शकणार आहेत.

 

दरवर्षी मिळतात 6 हजार रुपये –

 

पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM Farmers Honor Scheme) देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते.
या योजनेअंतर्गत देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6 हजार रुपये 3 हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2 हजार रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.

 

कशी कराल नोंदणी –

 

  • शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
  • त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ या टॅबवर क्लिक करा.
  • याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी करू शकता.
  • याठिकाणी ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका.
  • कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल.
  • तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील, शेतीविषयक तपशील विचारला जाईल.
  • ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

 

Web Title : PM-Kisan New Rules | pm kisan samman nidhi scheme pm kisan new rules ration card mandatory registration check when 10th installment will credit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | ‘…तर 100 टक्के क्षमतेने नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांना परवानगी देणार’ – अजित पवार

Pune Crime | धक्कादायक ! बारामतीमध्ये सैतानाचा अवतार असल्याचे सांगत महिलेला नग्न करुन बळी देण्याचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

Koregaon Bhima Violence Case | IPS अधिकारी परामबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे आदेश