Pune Crime | धक्कादायक ! बारामतीमध्ये सैतानाचा अवतार असल्याचे सांगत महिलेला नग्न करुन बळी देण्याचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

पुणे / बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  महिलेला सैतानाचा अवतार समजून मांत्रिकाच्या (black magic) सल्ल्याने तिला नग्न करुन तिचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामती तालुक्यात घडली आहे. बारामती तालुक्यातील करंजेपूल (Karanjepool) येथे ही खळबळजनक घटना (Pune Crime) घडली असून याप्रकरणी तिच्या सासरच्या चौघासह मांत्रिक अशा पाच जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

बारामती पोलिसांनी महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या माणिकराव गायकवाड (सर्व रा. करंजेपुल, ता. बारामती), नणंद निता अनिल जाधव (रा. चाकण)
व तात्या नावाचा मांत्रिक (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह
(Witchcraft Prevention Act) जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार (Pune Crime) दिली आहे.

 

तक्रारदार महिलेचा विवाह झाल्यापासून सासू व दीराकडून लग्नात जास्त हुंडा दिला नाही म्हणून छळ केला.
तसेच वारंवार मारहाण (Beating) केली. नणंद माहेरी आल्यानंतर तिनेही घरच्यांचे कान भरले.
दोन्ही दीर व सासूने तिला भूतबाधा झाली असल्याचे पसरवत तात्या नावाच्या मांत्रिकाला घरी बोलावले.
त्याने सांगितल्या प्रमाणे आरोपींकडून लिंबू उतरवणे, अंगारे-धुपारे टाकणे, भस्म लावणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे, उपाशी ठेवणे असे प्रकार केले.

 

दरम्यान, तक्रारदार महिलेला मुलगी झाल्यानंतर सासूने तू पांढऱ्या पायाची असल्याचे म्हणत घरातून हकलून देण्याचा प्रयत्न केला.
15 ऑक्टोबर 2021 रोजी दोन्ही दीर व सासू यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून तिला मारहाण करुन तिचे डोके भिंतीवर आपटले.
एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर आरोपींनी लाकडी दांडके, लोखंडी पाईपने मारहाण केली. तु सैतानाचा अवतार आहे, तुझा बळी देऊ असे म्हणत गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

त्याच दिवशी दीर व सासून तात्या मांत्रिकाला घरी बोलावून घेतले. हळदी-कुंकवाचे रिंगण करत त्यामध्ये तक्रारदार महिलेला बसवून नग्न करुन अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले.
तसेच तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून तिला डांबून ठेवले. हा प्रकार पती व मुलाला सांगितला तर मारुन टाकण्याची धमकी दिली.
तक्रारदार महिलेच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेत महिलेची सुटका केली.

 

त्यानंतर महिलेने तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. बारामतीला माहेरी येऊन तिने सासरच्या लोकांसह मांत्रिकाविरोधात फिर्याद दिली.
हा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या (Wadgaon Nimbalkar Police Station) हद्दीत घडल्याने गुन्हा बारामती शहर पोलिसांनी वर्ग केला आहे.
याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

 

Web Title : Pune Crime | black magic in baramati crime registered under Witchcraft Prevention Act

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | सरकारी बँकेत अकाऊंट आहे? मग ‘या’ योजनेचा घ्या लाभ; दरमहा 28 रुपये जमा करून 4 लाख मिळणार, जाणून घ्या

Koregaon Bhima Violence Case | IPS अधिकारी परामबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे आदेश

Fixed Deposit | बँकेत FD करण्याचा विचार करत असाल तर ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा, होईल जास्त फायदा