PM Kisan | खुशखबर ! 1 आठवड्यानंतर शेतकर्यांच्या खात्यात येतील 4000 रुपये, राज्य सरकारांनी केली आहे तयारी, चेक करा स्टेटस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत (pm kisan samman nidhi) मोदी सरकार (Modi Government) 15 डिसेंबरला तुमच्या खात्यात डिसेंबर-मार्चचा 2000 रुपयांचा 10 वा हप्ता टाकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही राज्य सरकारांनी Rft Sign केले आहे. म्हणजे आता केंद्र सरकारच्या मंजूरीची प्रतीक्षा आहे. तर, काही राज्यांच्या शेतकर्यांच्या स्टेटसमध्ये सध्या Waiting for approval by state लिहिलेले दिसत आहे, जे एक-दोन दिवसांच्या आत मंजूरी देतील. (PM Kisan)
केंद्र सरकारने आतापर्यंत देशातील 11.37 कोटी पेक्षा जास्त शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट 1.58 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर केले आहेत.
या शेतकर्यांना मिळतील 4000 रुपये
ज्या शेतकर्यांना अजूनपर्यंत 9व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही त्या लोकांच्या खातयात दोन हत्प्याचे पैसे एकाच वेळी म्हणजे त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर केले जातील. परंतु, ही सुविधा त्याच शेतकर्यांना मिळेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल.
तुम्हाला पैसे मिळतील किंवा नाही चेक करा
जर तुम्ही PM Kisan योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही.
लिस्टमध्ये असे चेक करा आपले नाव
1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
5. यानंतर Get Report वर क्लिक करा.
6. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.
अशाप्रकारे चेक करा हप्त्याचे स्टेटस
PM Kisan वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर (Farmers Corner) वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला स्टेटस दिसेल.
Web Title :- PM Kisan | pm kisan beneficiaries get 4000 rupees on 15 december state govt appoved rft sign check here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Vicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण ?
Pune Crime | पुण्यात गाड्यांची तोडफोड, टोळक्याचा कोयते हातात घेऊन नऱ्हे परिसरात ‘राडा’
Money Laundering Case | ‘हवाला’च्या माध्यमातून हाँगकाँगला पाठविले तब्बल 1100 काेटी रुपये; CA ला अटक