PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये आता होऊ शकते वाढ

पोलीसनामा ऑनलाइन – पीएम किसान योजना (PM Kisan) ही देशातील शेतकऱ्यांच्या हिताची आणि त्यांना आर्थिक सहाय्य देणारी महत्त्वाची योजना आहे. आपल्या कृषीप्रधान देशातील अनेक नागरिकांचा प्रमुख व्यवसाय आजही शेती आहे. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत (Central Government) दरवर्षी दिला जाणारा 6 हजार रुपये हा निधी थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत असतो. आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना (PM Kisan) या सन्मान निधीचे 14 हफ्ते मिळाले आहेत. पण यापुढे निधीच्या या रक्कमेत (PM Kisan Increase Amount) वाढ होणार आहे. शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बाब असून वर्षाच्या शेवटपर्यंत ही वाढ जाहीर केली जाणार आहे.

केंद्र सरकारतर्फे (Central Government) आत्तापर्यंत करोडो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ‘पीएम किसान योजना’चा सन्मान निधी डिपोजिट करण्यात आला आहे. आत्तापर्यंत दरवर्षी 6 हजार रुपये दिले जात होते. पण यापुढे या निधीमध्ये 50 % पर्यंत वाढ केली जाणार आहे. म्हणजेच जवळ जवळ प्रत्येक शेतकऱ्याला 2 हजार ते 3 हजार रुपये यापुढे जास्त मिळणार आहे. शेतकरी सन्मान निधीचा (Farmers Honor Fund) वापर शेतकऱ्यांना शेती उपयोगी कामांसाठी, अवजार व खते खरेदीसाठी होतो. यापुढे या रक्कमेमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.(PM Kisan)

एका वृत्तवाहिनीनुसार, प्रधानमंत्री कार्यालयामध्ये यासंबंधी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
हा प्रस्ताव मान्य झाल्यास सरकारचा 20,000 ते 30,000 कोटी रुपयांचा वार्षिक खर्च वाढणार आहे.
या निर्णायाची त्याची अंमलबजावणी कधी होणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र देशातील आगामी चार राज्यांमध्ये असणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेतला जाईल, असे बोलले जात आहे. राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh) आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुका (Telangana Assembly Elections) या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होतील. मध्य प्रदेशचे शेती क्षेत्रामध्ये 40 टक्के योगदान आहे. तसेच राजस्थान व छत्तीसगडचे जवळ जवळ 27 टक्के योगदान आहे. या राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर लवकरच पीएम किसान योजनाचा सन्मान निधीमध्ये वाढ केली जाणार आहे.

देशातील लोकप्रिय असणारी ही ‘पीएम किसान योजना’ (PM Kisan Samman Nidhi Yojana) 2018 सालापासून सुरु आहे.
आत्तापर्यंत लाखो करोडो शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला आहे. या योजनेंतर्गत दर चार महिन्यांनंतर 2000 रुपये थेट
शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले जातात. आत्तापर्यंत 14 हफ्ते दिले गेले असून सुमारे 8.5 कोटी शेतकऱ्य़ांनी हा
सन्मान निधी स्वीकारला आहे. पुढील पीएम किसान योजनेच्या हफ्तासाठी (PM Kisan Registration) प्रोसेस सुरु
झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ST च्या आगार प्रमुखासह वाहक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात