PM Kisan | पीएम किसानच्या 12 व्या हप्त्याबाबत आला सरकारचा नवीन आदेश, जाणून घेतला नाही तर होईल नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात येणार आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणे अपेक्षित आहे. अशावेळी तुम्ही ई-केवायसी करून घेणे महत्त्वाचे आहे. केवायसी करण्याची आज शेवटची तारीख आहे. ज्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले नाही, त्यांना हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत, असे सरकारकडून आधीच सांगितले गेले आहे. (PM Kisan)

 

2000 रुपयांसाठी आवश्यक आहे हे काम
ई-केवायसी (e-KYC) न केल्यामुळे, केंद्र सरकारद्वारे चालविण्यात येत असलेल्या या योजनेतील लाभार्थींची संख्या सातत्याने कमी होत आहे. अशावेळी, 2 हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही सरकारच्या आदेशानुसार आज रात्री 12 वाजेपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. यापूर्वी ही मुदत 31 जुलै होती, ती नंतर 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. (PM Kisan)

केवायसीची तारीख आता वाढणार नाही
अनेक लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याची माहिती सरकारला मिळाली. यानंतर सरकारने लाभार्थ्यांना ई-केवायसी करून घेण्यास सांगितले. यानंतर केवायसी करण्याची तारीख वाढवली जाणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. (PM Kisan e-KYC Update News)

 

जेव्हापासून केंद्र सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे, तेव्हापासून या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2021 दरम्यान, 11.19 कोटी शेतकर्‍यांना 9वा हप्ता मिळाला. त्यानंतर डिसेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान सुमारे 11.15 कोटी शेतकर्‍यांना 10 वा हप्ता मिळाला. 11 व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या 10.92 कोटींवर आली आहे.

 

Web Title :- PM Kisan | pm kisan samman nidhi new order on 12th installment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tamilnad Mercantile Bank | गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी ! पुढील आठवड्यात खुला होत आहे ‘या’ 100 वर्ष जुन्या बँकेचा IPO

 

Maharashtra Politics | फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्याने शिंदे गटाचे टेन्शन वाढलं, लोकसभेची ‘ही’ जागा गमावणार?; राजकीय चर्चेला उधाण

 

Ganeshotsav 2022 | ‘हे गणराया’ बाप्पाचं गाणं श्रोत्यांच्या भेटीस ! शंकर महादेवन यांचा श्रवणीय आवाज

 

Mahlunge-Maan Town Planning Scheme | म्हाळुंगे-माण टीपी स्कीमच्या कामाला गती देण्याचे PMRDA च्या आयुक्तांचे आदेश