Tamilnad Mercantile Bank | गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी ! पुढील आठवड्यात खुला होत आहे ‘या’ 100 वर्ष जुन्या बँकेचा IPO

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ड्रीमफॉक्सच्या आयपीओ (IPO) वर डाव लावण्याची तुमची संधी हुकली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण पुढील आठवडा तुमच्यासाठी पुन्हा एकदा गुंतवणुकीची संधी (Investment) आहे. Tamilnad Mercantile Bank चा आयपीओ पुढील आठवड्यात सुरू होत आहे. बँकेने या आयपीओच्या माध्यमातून 800 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. Tamilnad Mercantile Bank 1921 मध्ये स्थापन झाली होती.

 

किती आहे प्राईस बँड
Tamilnad Mercantile Bank आयपीओ 5 सप्टेंबर रोजी खुला होईल. त्याच वेळी, हा आयपीओ 7 सप्टेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. कंपनीने 28 शेअर्सचा लॉट निश्चित केला आहे. या आयपीओची किंमत 500 ते 525 रुपयांच्या दरम्यान असेल. कंपनी मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राझेस, कृषी आणि रिटेल कस्टमर्सला बँकिंग सेवा प्रदान करते. या आयपीओमधील 10 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.

 

बँकेचे करंट आणि सेव्हिंग डिपॉझिट सुमारे 30 टक्के आहेत. बँकेच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे.
2020-22 या आर्थिक वर्षात बँकेचा CAGR 41.99% होता. 2022 च्या आर्थिक वर्षात बँकेचा निव्वळ नफा 820 कोटी रुपये होता.
31 मार्च 2022 पर्यंत बँकेच्या एकूण 509 शाखा होत्या.
ज्यामध्ये शहरांमध्ये 106, निमशहरी भागात 247, शहरी भागात 80 आणि मेट्रो शहरांमध्ये 76 शाखा आहेत.
बँकेची सर्वात मजबूत स्थिती तामिळनाडूमध्ये आहे. जिथे बँकेच्या 369 शाखा आहेत.

 

Web Title :- Tamilnad mercantile bank ipo opens next week check price band lot size and other details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | TATA Group च्या 3 रुपयांच्या शेअरचा जबरदस्त रिटर्न, एक लाखाचे केले 169 कोटी

 

 Beed Accident | दुर्देवी ! महिला पोलीस कर्मचाऱ्यासह 9 वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू

 

Mohit Kamboj | भाजप नेत्यांबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल