PM Kisan च्या १५ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट! अनेक लाभार्थी चुकीच्या पद्धतीने घेतात लाभ, वसुलीची कारवाई सुरू

नवी दिल्ली : PM Kisan | लवकरच पीएम किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने या योजनेसंदर्भात मोठी कारवाई सुरू केली आहे. जे शेतकरी नोकरदार आहेत आणि जे आयकर भरतात आणि ज्यांनी या आधीच्या हप्त्यांचे पैसे घेतले आहेत त्यांच्याकडून सरकारने वसुली सुरू केली आहे. (PM Kisan)

अशा शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पैसे परत केले नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पीएम किसान योजनेत एका शेतकऱ्याला वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये एकूण ६००० रुपये दिले जातात. (PM Kisan)

सरकारने पीएम किसान योजनेचे ऑडिट केले असता यात देशभरातील कोट्यवधी लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले. यातील अनेक शेतकरी सरकारी नोकरी करतात अथवा आयकर भरणारे आहेत.

सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ३१ मार्च २०२३ पासून वसूलीसाठी सुरू आहे.
तसेच जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेत सहभागी करण्यासाठी पंचायत पातळीवर ई-केवायसीदेखील केले जात आहे.

२७ जुलै रोजी पीएम किसान योजनेचा १४व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
आता १५वा हप्ता घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवाईसी असणे आवश्यक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | ऑनलाईन गेमिंगमुळे पोलीस कर्मचारी बनला कर्जबाजारी, कर्ज फेडण्यासाठी लुटमारी करताना गोळीबार; एकाचा मृत्यू तर एक जखमी

Pune News | डीजे, लेझरविरोधी भूमिकेबद्दल कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांना धमकी