PM Kisan : डिसेंबरमध्ये सरकार देणार 2 हजार रुपये, तुम्ही केली ‘ही’ चूक तर अडकू शकतात पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान किसान योजनेचा सातवा हप्ता डिसेंबरपासून येण्यास सुरूवात होईल. आतापर्यंत शेतकर्‍यांना 2000-2000 रुपयांचे 6 हप्ते पाठवण्यात आले आहेत. सातव्या हप्त्यात शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सरकार 2,000 रुपये ट्रान्सफर करेल. जर तुम्ही पीएम किसान स्कीम अंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज करताना काही चूक केली असेल तर तुमचे पैसे थांबू शकतात. यासाठी लवकरात लवकर आपले रेकॉर्डस ठीक करा. जाणून घेवूयात, कोणत्या चुकांमुळे पैसे अडकू शकतात.

पीएम किसान स्कीममधून आतापर्यंत देशातील 11.17 कोटी शेतकर्‍यांना फायदा मिळाला आहे. वर्षात तीनवेळा शेतकर्‍यांच्या खात्यात 2 हजार रुपये ट्रान्सफर होतात. पहिला हप्ता – एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता – ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता – डिसेंबर ते मार्चच्या दरम्यान येतो.

या चूकांमुळे अडकू शकतात पैसे
1 डॉक्यूमेंट्समध्ये काही गडबड असेल
2 आधार नंबरची माहिती चूकीची देणे
3 आधार कार्डवर नाव किंवा पत्ता चुकीचा असणे
4 बँक खात्याची चुकीची माहिती
5 स्पेलिंगमध्ये गडबड

अशी तुमची चूकीची दुरूस्ती
ज्यांच्या अर्जात चुकीचा आधार नंबर आणि नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक किंवा अन्य एखादी चूक झालेली असते. अशा स्थितीत सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जारी करत नाही. मात्र, असे नाही की, एकदा अर्जात चूक झाली म्हणून पुन्हा ती दुरूस्त करता येत नाही, सरकारने यासाठी चुक सुधारण्याची सुविधा दिलेली आहे.

चेक करा नाव
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर दुरूस्त करू शकता. यासाठी तुम्ही https://www.pmkisan.gov.in/updateaadharnobyfarmer.aspx येथे क्लिक करा. याशिवाय जर तुमच्या नावात चूक असेल किंवा अकाऊंट नंबर दुरूस्त करायचा असेल तर वेबसाइटच्या होम पेजवर तुम्ही Benificary status वर क्लिक करून ते दुरूस्त करू शकता.