Pune Crime |  ‘भाई’ म्हणाला नाही म्हणून तरुणाला बेदम मारहाण, त्या ‘भाई’च्या मित्रांची वाकड पोलिसांनी मुंडण करुन काढली ‘धिंड’ (व्हिडीओ)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भाई म्हणाला नाही म्हणून एका तरुणाला बेल्टने बेदम मारहाण (Beating) करुन जमिनीवरील बिस्किट खायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) उघडकीस आला होता. या याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police) सहा जणांना अटक (Pune Crime) केली आहे. यामध्ये तिन अल्पवयीन आहेत. दरम्यान, मुख्य आरोपी रोहन वाघमारे (Rohan Waghmare) हा फरार असून या प्रकरणातील तीन जणांचे मुंडन करुन पोलिसांनी आरोपींची आज धिंड काढली.

 

प्रकाश इंगोले (Prakash Ingole), प्रशांत आठवले (Prashant Athavale), अजित उर्फ आदित्य काटे (Ajit alias Aditya Kate) अशी धिंड काढलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मुख्य आरोपी रोहन वाघमारे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली होती. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी थेरगाव (Thergaon) येथे आरोपी रोहन याने एका तरुणाला तू मला भाई (Bhai) का म्हणाला नाहीस. मी या परिसरातील भाई आहे, असे म्हणून जमिनीवरील बिस्किटं खायला लावून त्याला बेल्टने इतर मित्रांच्या मदतीने मारहाण केली. यामध्ये तरुणाच्या पाठीवर मारहाणीचे व्रण देखील उमटले होते. वाकड पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक (Arrest) केली. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

 

तर तीन आरोपींचे मुंडण करुन त्यांनी गुन्हा केलेल्या परिसरात रविवारी (दि.30) धिंड काढली.
अशा प्रकारचा गुन्हा (Crime) केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे म्हणत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash)
यांनी सज्जड दम दिला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर (Senior Police Inspector Dr. Vivek Mugalikar)
यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे (PSI Sangeeta Gode) यांनी केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Wakad Police Parade Accused Of Beating Youth With Belt For Not Addressing Their ‘Leader’ As ‘Bhai’ On Phone Call

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | सोशल मीडियावर अश्लील शब्द असलेले व्हिडीओ व्हायरल, स्वयंघोषीत ‘Thergaon QueenN’ ला अटक (व्हिडिओ)

 

Weight Loss – Protein Intake | वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही केवळ प्रोटीन डाएट तर घेत नाही ना? व्हा सावध, वाढू शकतो ‘हार्ट अटॅक’चा धोका

 

Shahir Hemantraje Mavale | ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा शाहीर हेमंतराजे मावळेंकडून निषेध, ‘व्यसनमुक्ती’ पुरस्कार केला परत