लोकसभा निवडणूक २०१९ : मोदी, शहा, आणि १५ मुख्यमंत्री राजधानीत..! 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

आपल्या पक्षाचा विजयी रथ कायम ठेवत भाजपने आता आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर संघाची आणि घटक पक्षांची सोबत असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे.

कर्नाटक  निवडणुकानंतर विरोधक एकत्र आले आहेत, किंबहुना त्यांना एकत्र याच्यासाठी भाग पडले जात आहे. काँग्रेसने घटक पक्षांना  आता दिली आहे, थोडक्यात त्यांनी एक पाउल मागे आले आहेत, याचा प्रत्यय कर्नाटक निवडणूकमध्ये दिसला आहे. सर्व विरोधकांची एकत्र येण्याची रणनिती असल्याने भाजप कोणत्याही बाबतीत कमी पडणार नाही याची काळजी घेत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आगामी निवडणुकांवर रणनीति आखणार आहे.  मोदी शहा, याच्या नेतृत्वाखाली भाजपशासित १५ राज्याचे मुख्यमंत्री बैठकीत उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतील ६, दीनदयाळ मार्गावरील मुख्यालयात ही बैठक पार पडणार आहे. या यामध्ये विधानसभा सोबतच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे धोरण निश्चित केले जाणार आहे.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’efde53bc-aaa9-11e8-8891-9f8a9dfc520a’]

अमित शहा देणार मूलमंत्र

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत अमित शहा २०१९च्या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. निवडणुकीत प्रचार कसा असणार आहे. याची आखणी आणि सोबतच, यात विविध भागातील प्रचार, एनडीए आघाडी, पक्ष संघटन याबाबत त्यांचे मत जाणून घेणार आहेत. त्यावर ते मार्गदर्शन करणार आहेत.  त्यानंतर पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’; दिल्लीत या होर्डिंग्जमुळे राजकीय खळबळ

सर्व लक्ष राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशवर…

पुढील निवडणूक जवळ आली आहे,  भाजपाची सत्ता ५ वर्ष पूर्ण करत आहे. आता या शेवटच्या वर्षात राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे  बैठकीमध्ये  ही राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांवर जास्त चर्चा होणार आहे. या राज्यातील पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीवर स्वतंत्र प्रजेंटेशन दिले जाणार आहे.