PM मोदींनी बोलावली ‘गोल्ड पॉलिसी’ संदर्भात महत्वाची बैठक ; जाणून घ्या सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार

नवी दिल्ली : गोल्ड पॉलिसीवर शुक्रवारी म्हणजे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाची बैठक घेणार आहेत. अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गोल्ड पॉलिसीवर चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच या मुद्यावर चर्चा करणार आहेत. या बैठकीत डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेयर्सचे सादरीकरण केले जाईल. यामध्ये सरकार गोल्ड पॉलिसीमध्ये काय करू इच्छित आहे याचेदेखील सादरीकरण करण्यात येणार आहे. हि बैठक यासाठी देखील महत्वाची आहे की या पॉलिसीला नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यास ५ जुलै ला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात गोल्ड पॉलिसीची घोषणा केली जाऊ शकते.

सरकारचा हेतू काय ?
गोल्डला एका फायनानशिअल असेट म्हणून विकसित करणे हा या पॉलिसीचा उद्देश आहे. यामुळे घरात पडून राहिलेले अनप्रॉडक्टिव्ह/अनुत्पादक सोने अर्थव्यवस्थेत येईल त्यामुळे अर्थव्यवस्थेस चालना मिळण्यास मदत होईल. घरात पडून राहिलेल्या सोन्याची उत्पादकता वाढविणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.

सोन्याची उत्पादकता वाढविण्यासाठी बनविण्यात येणार रणनीती

१) पहिल्या रणनीतीनुसार गोल्ड मोनेटायजेशन योजनेला अजून जास्त आकर्षक बनवण्यात येणार आहे यामुळे घरात पडून राहिलेले सोने बँकेला वापरायला मिळेल.

२) दुसऱ्या रणनीतीनुसार, ज्वेलरी सेक्टरला संघटीत क्षेत्र म्हणून विकसित केले जाईल. यासाठी गोल्ड बोर्ड बनविण्याचा प्रस्ताव आहे.

३) तिसऱ्या रणनीतीनुसार, ज्या कंपन्यांकडून ज्वेलरी निर्यात केली जाते त्या कंपनीला इंसेटीव्ह देण्यात येईल. आता त्याच्यावर ३ % GST लावण्यात येईल बऱ्याच वेळेनंतर हा GST परत मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा