PM मोदी यांनी का म्हटले – Credit goes to 130 कोटी ‘हिंदुस्तानी’ !

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएम नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर उत्तर देताना कोरोना महामारीचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, कोरोना संकटात 130 कोटी नागरिकांची शिस्त आणि त्यागाने आपल्याला वाचवले आहे. कोरोनाशी लढाईचे सर्व क्रेडिट नागरिकांना जाते.

लोकसभेत पीएम मोदी म्हणाले, काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, देवाच्या कृपेने आपण कोरोना महामारीपासून वाचलो. पीएमने यावर म्हटले की, आपण कोरोनाशी जिंकलो, कारण डॉक्टर्स, सफाई कर्मचारी, अ‍ॅम्बुलन्सचे ड्रायव्हर हे देवाच्या रूपात आले. पीएम मोदी म्हणाले, आपण त्यांचे जेवढे कौतूक करू तेवढी आपल्यात नवीन आशा निर्माण होईल.

ADV

आपल्यासाठी समाधानाचा आणि गर्वाचा विषय आहे की, भारत कशाप्रकारे या स्थितीला तोंड देणार, कोरोनामुळे किती अडचणी येतील याचे जे अंदाज वर्तवले जात होते. अशावेळी 130 कोटी नागरिकांनी शिस्त आणि त्यागाने आपल्याला वाचवले आहे.

पीएम म्हणाले, कोरोना काळात जनधन खाते, आधार, हे सर्व गरीबांच्या उपयोगी पडले. जगातील अनेक देश कोरोना, लॉकडाऊन, कर्फ्यूमुळे इच्छा असूनही, आपल्या खजिन्यात डॉलर आणि पाऊंड असूनही आपल्या लोकांपर्यंत पोहचू शकले नाहीत. परंतु, हिंदुस्तान आहे जो कोरोना काळात सुद्धा सुमारे 75 कोटीपेक्षा जास्त भारतीयांना 8 महिन्यांपर्यंत रेशन पोहचवू शकला.