मोदी ५६ इंच छातीचे ‘बॉक्सर’, त्यांचा पहिला ठोसा अडवाणींनाच

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीची खोचक टीका

भिवानी (हरयाणा) : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ च्या निवडणुकीत एखाद्या बॉक्सरप्रमाणे रिंगणात उतरले. रिंगणात उतरताच त्यानी पहिला ठोसा कोच लालकृष्ण अडवाणी यांना लगावाल्याची खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे. हरयाणा येथील भिवानी येथील प्रचार सभेत राहुल गांधी बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी पुढे म्हणाले, मोदी हे ५६ इंची छाती असलेले बॉक्सर आहेत असे जनतेला आणि कोच अडवाणी यांना वाटले होते. मात्र, त्यांना कुणाशी लढायचे आहे हे विरसरून गेले.

२०१४ च्या निवडणुकीत बॉक्सरप्रमाणे मोदींना राजकारणाच्या रिंगणात उतरवण्यात आले. त्यांनी रिंगणात उतरून बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार आणि इतर समस्या घेऊन उभ्या असलेल्या प्रतिस्पर्ध्याशी लढतील असे जनतेला वाटले होते. जनतेप्रमाणेच अडवाणी, गडकरी आणि जेटली यांना देखील वाटले होते. मात्र मोदींनी पहिला ठोसा अडवाणींनाच लगावला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा गडकरी आणि जेटली यांच्याकडे वळवला. त्यांनाही धडा धड ठोसे लगावले. त्यामुळे रिंगण सोडून आ
पले बॉक्सर कुठे जात आहेत हा जनतेला पडलेला प्रश्न असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू असून आज निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडला. एका बाजूला नरेंद्र मोदी रणनिती आखत विरोधकांचा पराभव किती मोठा होणार हेच पहाणे बाकी राहिल्याचे म्हणत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींनी मोदींना बॉक्सर म्हणत, कुणाशी लढायचे आहे हेच मोदी विसरल्याची खोचक टीका केली. राहुल गांधी यांच्या टीकेला मोदी किंवा भाजपा कशा पद्धतीने उत्तर देणार हे लवकरच समजेल.