अरूण जेटलींची प्रकृती चिंताजनक, विचारपूस करण्यासाठी PM मोदी जाणार रात्री 8 वाजता

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. अनेक मंत्री आणि विरोधी पक्षातील नेते त्यांना भेटण्यासाठी दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलमध्ये जात आहेत. जेटली सध्या लाइफ सपोर्ट सिस्टमवर असल्याचे सांगण्यात येत आहे. यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील जेटलींची एम्समध्ये जाऊन भेट घेतली होती. दरम्यान, पुन्हा आज रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्समध्ये जाऊन जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत.

प्रकृती बिघडल्याने ९ ऑगस्ट रोजी जेटली यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉक्टरांची एक टीम उपचार करीत आहेत. जेटलींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून शनिवारी हवन देखील करण्यात आले. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बन्सल यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये जेटलींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करण्यात आली आहे. शनिवारी बहुजन समाज पार्टीच्या मायावती, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक बडया नेत्यांनी एम्सला भेट देवून जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, भूतान दौऱ्यावरून आल्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता एम्सला भेट देवून जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त