PM Modi Visit To Pune | कचऱ्याचे 4 बकेट भरून काळ्या रंगाचे मास्क आणि टोप्यांचा खच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Visit To Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना काळे झेंडे दाखवणे, त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन (Agitation) असे प्रकार महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) मधील पक्षांनी सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयटी महाविद्यालयाच्या (MIT College) मैदानावर होणाऱ्या पंतप्रधानाच्या कार्यक्रमात (PM Modi Visit To Pune) येणाऱ्या नागरिकांना काळ्या रंगाच्या मास्क (Black mask), टोपी (Hats), शर्ट (Shirts) घालून येण्याला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे काढून टाकण्यात आलेले मास्क, टोपी यांचा खच सुरक्षा रक्षक (Security Guard) यांच्या जवळ पडले होते.

 

पंतप्रधानाच्या प्रोटोकॉल (PM Protocol) प्रमाणे काळया रंगाच्या वस्तू नेण्याला परवानगी नसते. त्यामुळे त्या गोष्टी पोलिसांनी कडकपणे तपासायला सुरुवात केली. अनेकांचे मास्क काळया रंगाचे होते, तर काहींनी ऊन लागू नये म्हणून घातलेल्या टोप्या काळ्या रंगाच्या होत्या. त्या पोलिसांनी (Pune Police) काढायला लावल्या. त्या खिशात ठेवून नेण्यालाही परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्या गोष्टी नाईलाजाने कचऱ्याच्या टोपलीत टाकाव्या लागत होत्या. यामुळे किमान तीन ते चार कचऱ्याच्या (Garbage) मोठ्या बकेट भरून या गोष्टी जमा झाल्या. (PM Modi Visit To Pune)

 

मास्क शिवाय (Without Mask) कोणाला आत जाऊ देणेही नियमबाह्य आहे त्यामुळे त्यांना तोंडाला रुमाल बांधून जाण्याला परवानगी देण्यात आली. मात्र ज्यांच्याकडे ही देखील सोय नव्हती त्यांना सभास्थळी जाता आले नाही.

महिलांची झाली पंचाईत
अनेक महिला कार्यकर्त्यांनी सोबत आणलेली पर्स (Handbag) सभास्थानी नेण्याला परवानगी नाकारण्यात आली.
त्यामुळे अनेक महिलांची पंचाईत झाली. आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये पर्स (Purse) ठेवण्याची विनंती अनेक महिलांनी तेथील रहिवाशांना केली.
काही जणांनी त्याला परवानगी दिली तर काहींनी नाकारली. मात्र पर्स सुरक्षित राहील ना याची चिंता मात्र महिलांमध्ये होती.

 

 

Web Title :- PM Modi Visit To Pune News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP Maharashtra | ’50 वर्षीय राजकारणात तुम्ही किती मेट्रो प्रकल्प पुण्यात आणले?, कौतुक करण्याचा तरी मनाचा मोठेपणा दाखवा’

 

Diabetes Management | डायबिटीज रुग्णाने झोपण्यापूर्वी आवश्यक करावे ‘हे’ काम, कंट्रोल राहिल ‘ब्लड शुगर’