Aryan Khan | जेलमधून बाहेर आलेल्या आर्यनला धक्का, शाहरुख आणि गौरीने मुलासाठी घेतला मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रूझवरील ड्रग्स पार्टीवर (Mumbai Cruise Drugs Party) एनसीबीने छापा (NCB raid) टाकून अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक केली. या प्रकरणात आर्यन खानला (Aryan Khan) तब्बल 25 दिवसानंतर जामीन मंजूर (Bail granted) झाला आहे. गुरुवारी जामीन मंजूर झाल्यानंतर शनिवारी जेल प्रशासनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून (Arthur Road Jail) सुटका केली. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याचे ‘मन्नत’मध्ये जोरादर स्वागत करण्यात आले. 25 दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर आर्यनला घरी घेऊन जाण्यासाठी स्वत: शाहरुख जेलबाहेर पोहचला होता. महत्त्वाचं म्हणजे 25 दिवस जेलमध्ये राहिल्याने आर्यनला मोठा धक्का बसला आहे.

 

आर्यनला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी शाहरुख (Shah Rukh) आणि गौरीने (Gauri Shah Rukh) मोठा निर्णय (big decision) घेतला आहे. या दोघांनी आर्यनसाठी खास डायट प्लान (Diet plan) तयार केला असून यामध्ये काऊन्सिलिंग पासून (Counseling) हेल्थ चेकअप (Health checkup) पर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. यामुळे आर्यनला पूर्ववत होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. आर्यनच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची (expert doctors) निवड करण्यात आली आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यनची (Aryan Khan) आरोग्य चाचणी करण्यात येणार आहे.
आर्यनची रक्त तपासणी केली जाणार आहे. जेलमध्ये राहिल्याने त्याच्या तब्येतीवर मोठा परिणाम झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे ही विशेष तयारी करण्यात आली आहे. याशिवाय आर्यनसाठी (Aryan Khan) विशेष काऊन्सलिंग सेशन आयोजित करण्यात आले आहेत.
शारीरिक तपासणीसोबत त्याच्या मानसिक आरोग्याची (Mental health) देखील काळजी घेतील जाणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे आर्यनला सर्वचं पार्ट्यांपासून दूर ठेवले जाणार आहे.

 

Web Title :- Aryan Khan | gauri and shah rukh took big decision for aryan khan after bail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Rains | उद्यापासून राज्यात पाऊस, ‘या’ दोन दिवशी पुण्यात मेघगर्जनेसह कोसळणार सरी

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है म्हणतात, मग शरद पवारांना विचारा…’

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 79 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

SBI Quick | एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारे सुद्धा चेक करू शकता SBI अकाऊंट बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया