‘कोरोना’ काळात सहाव्यांदा संबोधित करणार PM मोदी, आज चीनबद्दल काय बोलणार याकडे देशाचं ‘लक्ष’, जाणून घ्या आतापर्यंत काय केल्या घोषणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा राष्ट्राला उद्देशून संबोधित करणार आहेत. देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढण्याचा वेग आणि सीमेवर जारी तणावादरम्यान होत असलेल्या या भाषणाकडे प्रत्येकाचे लक्ष आहे. देशात जेव्हापासून कोरोना व्हायरसचे संकट आले आहे, तेव्हापासून आतापर्यंत पंतप्रधानांनी अनेक महत्वाच्या वेळी देशाला संबोधित केले आहे. आजचे त्यांचे संबोधन सहाव्यांदा होत आहे. यापूर्वी जनता कर्फ्यूच्या आवाहनापासून 20 लाख कोटीच्या पॅकेजपर्यंत पीएमने राष्ट्राला संबोधित केले आहे. दरम्यान, चीन बद्दल आज मोदी काय बोलणार याकडे देशाचे लक्ष आहे.

कोरोना संकटात राष्ट्राला उद्देशून केलेली भाषणे

19 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटात प्रथमच या दिवशी देशाला संबंधित केले होते. या दिवशी जनता कर्फ्यूची घोषणा केली गेली होती, जो 22 मार्चला ठेवण्यात आला होता.

24 मार्च : दुसर्‍या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. जे 25 मार्चपासून सुरू झाले आणि 21 दिवस चालले.

3 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात लोकांना दिवे लावण्याचे आवाहन केले. देशातील कोरोना वॉरियर्सचा सन्मान करण्यासाठी रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांपर्यंत दिवे लावण्यात आले.

14 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन 2.0 ची घोषणा केली, जे 3 मेपर्यंत चालले. यानंतरचे सर्व लॉकडाऊन गृह मंत्रालयाने लावले.

12 मे : पंतप्रधानांनी शेवटच्यावेळी 12 मे रोजी भाषण केले, ज्यामध्ये त्यांनी 20 लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. या अंतर्गत देशातील छोटे व्यापारी, मजूर, गरिबांना आर्थिक मदत, कर्जाच्या मदतीची घोषणा केली.

30 जून : आता आज सायंकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून भाषण करतील.

देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत आहेत आणि ही संख्या 6 लाखांच्या जवळपास पोहचली आहे. यादरम्यान सोमवारीच सरकाने अनलॉक 2 ची माहिती जारी केली आहे.