‘घर की बात’ करत मोंदीनी फोडला ‘मिशन २०१९’ चा नारळ

शिर्डी :पोलीसनामा आॅनलाईन : यूपीएच्या कार्यकाळात ४ वर्षांत २५ लाख घरे बांधण्यात आली होती. तर भाजप सरकारच्या कार्यकाळात १ कोटी २५ लाख घरे बांधण्यात आली आहेत. नितीमत्ता स्वच्छ असल्यावर कामं जलद गतीने होतात, अशा शब्दांत विरोधकांवर टीका कर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन २०१९ चा नारळ फोडला.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d6d0258-d386-11e8-91c2-bf6d071312ab’]

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीच्या दाैऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना चाव्या दिल्या. प्रातिनिधीक स्वरुपात त्यांनी १० लाभार्थींना चाव्या दिल्या.  यावेळी त्यांनी लाभार्थींंशी मराठीतून संवाद साधला.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, आधीचं सरकार असतं, तर तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हायला अजून २० वर्षे लागली असती. घरकूल योजना आधीही होत्या, आताही आहेत. मात्र त्यावेळच्या योजनांची अंमलबजावणी फक्त मतपेढी डोळ्यासमोर ठेवून केली जायची, अशी टीका मोदींनी केली.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92bfc613-d386-11e8-bb1a-93802d5f46d9′]

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील २९ जिल्ह्यातील पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील घरकुलांचं ई-वितरण केलं. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे घरकुल लाभार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी सरकारकडून ४ वर्षात करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली. त्यांनी काँग्रेस आणि भाजपा सरकारच्या कार्यकाळातील कामांची तुलनादेखील केली.

‘आधीचं सरकार घर बांधण्यासाठी ७० हजार रुपये देत असे. मात्र आम्ही त्यासाठी १ लाख रुपये देतो. तसेच आम्ही दिलेल्या घरांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. भाजप सरकारने गेल्या ४ वर्षात तब्बल सव्वा कोटी घरं उभारली. मागील सरकारच्या कामाचा वेग पाहता इथंपर्यंत पोहोचायला त्यांना आणखी २० वर्ष लागली असती,’ अशी आकडेवारी सांगत पंतप्रधानांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97cf3ef0-d386-11e8-a93d-612c0e5a7db3′]
नरेंद्र मोदी यांनी यावेळी जलयुक्त शिवार कामांचंही तोडंभरुन कौतुक केलं. जलयुक्त शिवार या योजनेमुळे महाराष्ट्रातील १६ हजार गावे ही दुष्काळमुक्त झाल्याचा दावाही मोदी यांनी केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुमारे ४२ हजार गावं आहेत. मोदींच्या दाव्यानुसार सुमारे ४० टक्के ग्रामिण महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त आहे. मात्र ग्रामिण महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिल्यानंतर या दाव्यात तथ्य वाटत नाही.