PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

यवतमाळ : PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीरोजी यवतमाळ येथे येत असून ते महिला मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. यवतमाळ शहरालगत नागपूर मार्गावरील भारी शिवारात हा महिला बचत गटांचा मेळावा होणार आहे. २०१४ पासून लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha) मोदी यवतमाळमध्ये सभा घेत आहेत, आता ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे लोकसभेचे रणशिंग येथूनच फुंकले जाण्याची शक्यता आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी हा मेळावा आयोजित केला आहे. सुमारे दोन लाख महिला मेळाव्याला येऊ शकतात, असा अंदाज आहे. ४३ एकर खुल्या जागेवर ही सभा होत आहे. तब्बल २६ एकरवर मंडप उभारला जात आहे. यापूर्वीची सभा रद्द झाल्यानंतर आता २८ तारखेला पंतप्रधान येत आहेत.

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील दाभडी येथे पहिल्यांदा २०१४ मध्ये मोदींनी पंतप्रधानपदाचे दावेदार असताना सभा घेतली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना शेतमालास हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केळापूर येथे मोदींनी महिला मेळावा घेतला.
या मेळाव्यात त्यांनी महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा केली होती. आता ते तिसऱ्यांदा येथे येत आहेत.

मोदीजींनी यवतमाळमध्ये सभा घेतल्यानंतर काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होते,
असा मागील अनुभव असल्याने ही सभा महत्वाची मानल जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार

Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य ! छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास मांडणार, 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन