स्वातंत्र्यानंतर कधी घडलं नव्हतं ते घडलं, PM मोदींकडून देशभरातील सरपंचांना ‘या’ कारणासाठी पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यासह देशातही दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. आता या दुष्काळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक निर्णय घेतला आहे. पावसाचे पाणी कसे संग्रहीत करावे यावर गावातील सभांमध्ये चर्चा करा, असं आवाहन मोदींनी केले आहे. उत्तर प्रदेशमधील ६३७ हून अधिक गावातील सरपंचांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहीलेले पत्र मिळाले आहे.

मोदींनी पत्रात यंदाच्या मान्सूनच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणारे जलसंकट टळू शकेल, असं मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वाक्षरी असलेले हे पत्र जिल्हाधिकारी सरपंचांना किंवा त्या गावच्या प्रमुखांना देणार आहेत.

पत्रात जास्तीत जास्त लोकांना पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी आवाहन करण्याच्या सूचना मोदींनी सरपंचांना केल्या आहेत. प्रिय सरपंचजी नमस्कार. आता मान्सूनचे लवकरच आगमण होणार आहे. आपण नशीबवान आहोत की, देव आपल्याला पावसाच्या रुपाने मोठ्या प्रमाणात पाणी देतो. आपण सगळ्यांनी मिळून या पाण्याचे संवर्धन करण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटलं.

गावातील लोकांशी जलसंवर्धनासंदर्भात चर्चा करावी. मला विश्वास आहे की, तुम्ही पाण्याचा प्रत्येक थेंब साठवून ठेवाल, असं मोदींनी या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, मोदींनी आपला कार्यभार स्वीकारल्यानंतर देशाच्या कामाला सुरुवात केली आहे. मोदींनी जल संरक्षणासाठी पहिले पाऊल घेतले आहे.

सिने जगत –

‘फेमिना मिस इंडिया’चा ‘ताज’ राज्यस्थानच्या सुमन रावच्या डोक्यावर

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’