PM Narendra Modi | ‘तुम्ही योद्धे आहात, तुम्हाला लढायचं आहे’; PM मोदींचा शरद पवारांना फोन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PM Narendra Modi | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. याबाबत माहिती स्वत: शरद पवार यांनी आपल्या ट्विटवरुन दिली. त्याचबरोबर कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचं पवार यांनी सांगितलं. दरम्यान कोरोना झाल्याचे समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट शरद पवार यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. ”तुम्ही योद्धे आहात, तुम्हाला लढायचं आहे,” असं देखील मोदी यांनी शरद पवारांना म्हटलं असल्याचे कळते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तब्येतीची विचारपूस केल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. त्यांच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे.” असं शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

दरम्यान, नुकतंच शरद पवार यांनी कोरोना झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली होती. ”माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.” असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- PM Narendra Modi | pm narendra modi speaks to ncp chief sharad pawar over phone after he found covid positive

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा