PM Narendra Modi | पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट? राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Narendra Modi | पंजाबमध्ये (Punjab) हुसैनीवाला येथील शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी (5 जानेवारी) रोजी दुपारी एका फ्लायओव्हरवर शेतकऱ्यांनी रोखला होता. दरम्यान अशा अचानक घडलेल्या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली होती. यानंतर पंतप्रधान मोदी पंजाब दौरा अर्धवट सोडून भटिंडा येथून विमानाने दिल्लीत परतले. ‘मी भटिंडा विमानतळावरुन जिवंत परतलो असं मोदीच्या वक्तव्यानंतर आता वेगळीच चर्चा रंगताना दिसत आहे. यानंतर आता पंजाबमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ (Presidential Reign) लावण्याचा पर्याय केंद्रासमोर असू शकतो, असा तर्कवितर्क राजकीय वातावरणात उत धरत आहे.

 

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाहनांचा ताफा अडवल्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (CM Charanjit Singh Channi) यांच्यावर भाजपने (BJP) निशाणा साधला आहे. त्यामुळे गेली अनेक दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात सुरू असलेले तर्क वितर्क आता राष्ट्रपती राजवट (Presidential Reign) लावण्याकडे धरत असल्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसते. काँग्रेस राजवटीत विधानसभा निवडणूक खुल्या आणि निर्भय वातावरणात घेतली जाऊ शकणार नाही. वादग्रस्त ठरलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून धोका असण्याची शक्यता वर्तवली जातेय. (PM Nearendra Modi)

 

दरम्यान, ‘गर्दी न जमल्यामुळे मोदींची सभा रद्द करण्यात आली. मोदी हेलिकॉप्टरद्वारे सभेच्या ठिकाणी जाणार होते.
त्यांनी अचानक रस्त्यावरून जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऐनवेळी रस्त्यावर दहा हजार पोलीस तैनात केले.
असे असतानाही शेतकरी या मार्गावर अचानक दाखल झाले. त्यांना हटविण्यास वेळ लागला.’ असं म्हणत काँग्रेसनं (Congress) मोदी यांच्या पंजाब दौऱ्याच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा दावा फेटाळला आहे.
दरम्यान, भाजप हा पंजाबमधील मुख्य पक्ष नसला तरी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी याठिकाणी किती सभा घेणार? अथवा या ठिकाणचा प्रभाव अन्य राज्यावर होणार का? या उद्देशातून राजकीय वर्तुळात तर्क वितर्क होताहेत.

 

Web Title :-  PM Narendra Modi | presidential rule punjab argument being fought political circles after narendra modi return

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ration Card | रेशनच्या यादीतून कापले असेल तुमचे नाव, तर घरबसल्या ताबडतोब असे तपासा

 

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीचे दर कमी; जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

 

Horoscope-2022 | शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा कुंभ राशीवर?, जाणून घ्या