Mission Shakti : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने ‘मिशन शक्ती’ अंतर्गत अँटी सॅटेलाईट मिसाईल लाँच केले आहे. याबाबतची माहीती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे सर्वात मोठे पाऊल मानावे लागेल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील महत्वाचे १० मुद्दे आता पाहूया.

१) भारताने अँटी सॅटेलाईट मिसाईल लाँच केले आहे “मिशन शक्ती” असे या मिशनचे नाव आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाईटचा वेध घेतला.

२) अशा स्वरूपाने लाईव्ह सॅटेलाईट पाडणारा भारत चौथा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो.

३) भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला.

४) ‘मिशन शक्ती’ नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं, ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती.

५) अँटी सॅटेलाईट क्षेपणास्त्रामुळे भारताची संरक्षण सज्जता वाढली आहे.

६) सॅटेलाईट पाडताना भारताने कोणत्याही आंतराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले नाही.

७) भारत आज अंतराळात महाशक्ती झाला आहे.

८) कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही, हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही.

९) ही कामगिरी भारतीय बनावटीच्याच A-SAT या क्षेपणास्त्राद्वारे केली. या अभियानाशी संबंधित सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज त्यांनी पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

१०) सुरक्षेच्या बाबतीत भारत शक्तिशाली.