PM Vaya Vandana Yojana | निवृत्तीनंतर आधार देईल प्रधानमंत्री वय वंदना योजना, दर महिना मिळेल 9,250 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी करावी गुंतवणूक

नवी दिल्ली – वृत्त संस्था – PM Vaya Vandana Yojana | निवृत्तीनंतर रोजच्या खर्चासाठी लोकांना समस्येला तोंड द्यावे लागते. यासाठीच केंद्र सरकारची (Central Government) एक योजना असून यामध्ये तुम्हाला दरमहिना 9250 रुपयांची पेन्शन मिळते. ज्याद्वारे तुम्ही निवृत्तीनंतर आपले जीवन सहजपणे जगू शकता. या योजनेचे नावप्रधानमंत्री वय वंदना योजना (PM Vaya Vandana Yojana) आहे. या योजने बाबत सविस्तर जाणून घेवूयात…

कुठे करावी लागेल गुंतवणूक

प्रधानमंत्री वय वंदना योजना (Prime Minister Vaya Vandana Yojana) ही सरकारी पेन्शन योजना आहे. जी भारतीय आयुर्विमा महामंडळ चालवत आहे. ही योजना 4 मे 2017 रोजी केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली. या योजनेत एकरकमी किंवा दर महिन्याला गुंतवणूक करण्यास सूट आहे.

किती मिळते व्याज

केंद्र सरकारच्या या योजनेत वार्षिक 7.40 टक्के दराने व्याज दिले जाते. ज्यामध्ये दरमहा एकरकमी जमा करून निश्चित पेन्शन मिळू शकते. या योजनेत एकरकमी गुंतवणुकीची मर्यादा 7.5 लाख रुपये होती. जी आता 15 लाख रुपये करण्यात आली आहे.

दर महिना मिळेल 9250 रुपयांची पेन्शन

पीएम वय वंदना योजनेअंतर्गत जास्तीत जास्त मासिक पेन्शनची रक्कम 9250 रुपये आहे. तुम्ही 27,750 रुपये अर्धवार्षिक पेन्शन म्हणून घेऊ शकता आणि तुम्हाला वार्षिक पेन्शन हवी असेल तर तुम्हाला 1.11 लाख रुपये मिळतील. पण यासाठी तुम्हाला PMVVS स्कीममध्ये 15 लाख रुपये जमा करावे लागतील. (PM Vaya Vandana Yojana)

या योजनेची मुदत 10 वर्षे आहे. जर पती-पत्नी या योजनेत एकत्र गुंतवणूक करत असतील आणि गुंतवणुकीची रक्कम 30 लाख रुपये असेल, तर दरमहा 18,500 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

कोण करू शकतात गुंतवणूक

60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक पीएम वय वंदना योजना घेऊ शकतो.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी करावी लागत नाही.
दुसरीकडे, योजना सुरू असताना गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला संपूर्ण रक्कम परत मिळते.
याशिवाय या योजनेत तीन वर्षांनी कर्ज घेण्याचीही सुविधा आहे.

Web Title : PM Vaya Vandana Yojana | after retirement sahara become prime minister vaya vandana yojana get pension of rs 9 250 every month

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalna Crime | विवाहितेची 4 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या; जालना जिल्ह्यातील घटना

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Punit Balan Group | पहिली ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदसाठी लढत!

 

LPG Cylinder Price | नवीन वर्षात मोठी भेट ! थेट 100 रुपये स्वस्त झाला कमर्शियल LPG सिलेंडर, घरगुती सिलेंडरमध्ये बदल झाला का?, जाणून घ्या