PMC बँक घोटाळा : HDIL च्या मालकाचे 2 ‘खासगी’ विमान तसेच ‘यॉट’च्या लिलावाचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PMC बँक प्रकरणी मुंबईच्या जिल्हा न्यायालयाने HDIL ग्रुपच्या प्रोमोटर्स आणि ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या संपत्तीचा लिलाव करण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने मालक राकेश वधवान आणि त्यांचा मुलगा सागरचे दोन विमान आणि एक यॉटचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय रिझर्व बँकद्वारे नियुक्त प्रशासकाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पीएमसी बँक प्रकरणी जितक्या संलग्न संपत्ती होत्या त्यांना जारी करण्यास सांगण्यात आले होते जेणे करुन लिलाव केला जाईल.

दोन विमाने आणि एक यॉटच्या लिलावाचे आदेश –
न्यायालयाने PMC बँकेप्रकरणी आरबीआय द्वारे बनवण्यात आलेल्या टीमला लिलावीसंबंधित प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश देण्यात आले. पीएमसी बँकेत 4,355 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. आरबीआयद्वारे गठन करण्यात आलेल्या एडमिनिस्ट्रेटिव्सने पीएमसी बँक प्रकरणात तपास यंत्रणांकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीला विकण्याची मागणी करत मेट्रोपोलियन न्यायालयचा दरवाजा ठोठावला होता.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या मते पीएमसी बँक व्यवस्थापनाने वधवान यांच्या बरोबर मिळून HDIL ग्रुप लोन डिफॉल्टला बँकिंग रेग्युलेटरकडून छापण्यात आले. ईओडब्यून सांगितले की बँकेला 70 टक्के कर्ज एचडीआयएल ग्रुपला देण्यात आले होते, रियल्टी ग्रुप द्वारे रिपेमेंट डिफॉल्ट झाल्याच्या कारणाने इतकी मोठी समस्या उभी राहिली. आरबीआयने 24 सप्टेंबरला पीएमसी बँकने संचालनावर रोख आणली होती आणि आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी प्रशासक नियुक्त करण्यात आला होता.

Visit : Policenama.com