PMC Encroachment Action | पुण्याच्या तुळशीबागेतील 250 स्टॉलवर अतिक्रमण विभागाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Encroachment Action | पुण्यातील तुळशीबागेतील (Tulsi Baug Pune) 250 स्टॉलवर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात आली. ज्या फेरीवाले व्यावसायिकांनी (Hawker Professionals) एप्रिल 2018 पासून परवाना शुल्क (License Fee) भरले नव्हते अशा व्यावसायिकांवर अतिक्रमण विभागाने (PMC Encroachment Action) कारवाई केली आहे. या व्यावसायिकांकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी आहे. अटी (Terms) व शर्तींचा (Conditions) भंग करणाऱ्या फेरीवाले व्यावसायिकांचे स्टॉल गुरुवारी (दि.19) बंद करण्यात आले होते.

 

पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने (PMC Encroachment Action) गुरुवारी फेरीवाले व्यावसायिकांवर कारवाई केल्यानंतर 221 पैकी 95 जणांकडून थकबाकी शुल्क वसूल करण्यात आले. यापुढेही दैनंदिन कारवाई केली जाणार आहे. डीपी रस्त्यावरील (DP Road) कारवाईनंतर अतिक्रमण विभागाची कारवाई संथ झाल्याचे दिसून आले.

रस्ता आणि पदपथांवर अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर तसेच पुणे महापालिकेने अतिक्रमण विभागामार्फत दिलेले परवाने व फेरीवाला प्रमाणपत्रावरील अटी – शर्तींचा भंग करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये स्वत: व्यवसाय न करणे, पोटभाडेकरु ठेवणे, दिलेल्या जागेवर व्यवसाय न करणे, परवानगी दिलेला व्यवसाय न करणे, गॅस सिलिंडर, स्टोव्हचा वापर करणे इत्यादी प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

 

तुळशीबागेसह अतिक्रमण विभागाने आणि बांधकाम विभागाने शिवाजीनगर (Shivajinagar) – घोले रस्ता (Ghole Road),
धनकवडी (Dhankawadi) – सहकारनगर (Sahakar Nagar), कसबा (Kasba) –
विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय (Vishrambagwada Regional Office) हद्दीमध्ये अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली.
त्यात कात्रज – कोंढवा रोड (Katraj – Kondhwa Road), बहिरटवाडी (Bahiratwadi),
भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth) परिसरातील अंदाजे 6 ट्रक माल, 1 स्टॉल, 7 काऊंटर आणि 4 शेडवर कारवाई करण्यात आली.
कात्रज कोंढवा रोड येथील अंदाजे 3 लाख चौरस फूट अनधिकृत बांधकामावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.

 

 

Web Title :- PMC Encroachment Action | pmc anti encroachment departments action on about 250 stalls in tulshi baug pune pmc news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा