PMC Medical College | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टवरील ‘पदसिद्ध’ नगरसेवकांचे संचालकपदही येणार संपुष्टात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Medical College | पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) सभासदांची मुदत येत्या 14 मार्च रोजी संपत असल्याने नुकतेच मान्यता मिळालेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Pune) न्यासाच्या (Trust) ‘पदसिद्ध’ संचालकांचीही (Director) मुदत संपणार आहे. यामुळे उर्वरीत तांत्रिक प्रक्रिया (Technical Process) पुर्ण करून प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू (PMC Medical College) करण्याबाबतचे सर्व निर्णय देखिल संचालक पदावर असलेले महापालिकेचे अधिकारी व अन्य संचालकच घेतील, अशी चिन्हे आहेत.

 

डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या (Dr. Naidu Hospital Pune) जागेवर महापालिकेचे स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय (PMC Medical College) व रुग्णालय उभारण्याची संकल्पना सर्वप्रथम काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे (Congress Corporator Arvind Shinde) यांनी त्यांच्या स्थायी समिती (PMC Standing Committee) अध्यक्षपदाच्या काळात 12 वर्षांपूर्वी मांडली होती. परंतू काही प्रयत्नांनंतर तो प्रस्ताव बारगळला. 2017 मध्ये भाजपा (BJP) महापालिकेत सत्तेत आल्यानंतर पहिले स्थायी समिती अध्यक्ष व विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी या संकल्पनेचे पुर्नजीवन केले. एवढेच नव्हे तर सातत्याने याचा पाठपुरावा केला. धर्मादाय कायद्यानुसार (Charity Act) ट्रस्ट स्थापन (Trust Establishment) करून हे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय एकमताने झाल्यानंतर पुढील पावले वेगाने पडली. सध्याच्या राज्य शासनासोबतच केंद्र सरकारनेही (Central Government) गतीने निर्णय घेतल्याने तीन वर्षांत मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

 

दरम्यान, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता, सर्व पक्षीय गटनेते पदावरील पदसिद्ध नगरसेवक या महाविद्यालयाच्या ट्रस्टवर संचालक राहतील असे ट्रस्टच्या घटनेतच नमूद केले आहे. येत्या 14 मार्चला विद्यमान पदसिद्ध संचालकांच्या नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांची पदेही संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे आपोआप त्यांचे ट्रस्टवरील संचालकपदही संपुष्टात येणार आहे. महापालिकेच्या निवडणुका अनिश्‍चित काळामुळे लांबल्याने 15 मार्चपासून महापालिकेवर आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांचीच प्रशासक (Administrator) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त, आरोग्य प्रमुख व अन्य अधिकारी देखिल महाविद्यालयाच्या ट्रस्टवर संचालक आहेत. त्यामुळे नवीन पदसिद्ध संचालकांची नियुक्ती होईपर्यंत ट्रस्टचा कारभारही हे अधिकारीच पाहातील, असे स्पष्ट होत आहे.

वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्टची बुधवारी (9 मार्च) बैठक होत आहे.
या बैठकीमध्ये महाविद्यालय सुरू करण्याबाबतची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे तसेच अन्य निर्णय होण्याची शक्यता आहे.
मात्र, या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासही काही दिवसांचा कालावधी लागणार असून उर्वरीत संचालकच पुढील निर्णय घेतील, असे तूर्तास दिसून येत आहे.

 

यासंदर्भात महापालिकेच्या विधी अधिकारी निशा चव्हाण (Nisha Chavan) यांना विचारले असता त्या म्हणाल्या उद्या महाविद्यालय ट्रस्टची बैठक आहे.
सर्व कायदेशीर बाबी तपासूनच याबाबत अधिक स्पष्टीकरण देणे उचित होईल.

 

Web Title :- PMC Medical College | Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Pune News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nandurbar Police | महिला दिनानिमित्त नंदुरबार महिला पोलिसांची बाईक रॅली

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत थोडी वाढ, मात्र मृत्यू संख्या घटल्याने दिलासा; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nitesh Rane | बाळासाहेब ठाकरेनंतर देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट – नितेश राणे