Pune : ‘पीएमपी’ची लोहगाव विमानतळावरून ई-बससेवा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीची) गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली ई- बससेवा (pmp-launches-e-bus-service) शुक्रवार (दि. 23) पासूून सुरु करण्यात आली आहे. या बससेवेचे उद्घाटन खासदार आणि एअरपोर्ट अ‍ॅडव्हायसरी कमिटीचे अध्यक्ष गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. लोहगाव विमानतळावर हा कायर्क्रम पार पडला. विमानतळ संचालक कुलदीप सिंग, आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी- चिंचवडच्या महापौर माई ढोरे, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकडॉ. राजेंद्र जगताप, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे आणि पीएमपीतील अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

या योजनेतील बसेस सुरुवातीला शहरातील पाच मार्गावर धावणार आहेत. यात एकूण 43 स्मार्ट इलेक्ट्रीक बसेस शहरातील विविध भागातून प्रवाशांना विमानतळावर पोहचवेल. मध्यंतरीच्या काळात पीएमपीने प्रायोगिक तत्वावर 10 बसेस विमानतळावरून सुरु केल्या होत्या. मात्र कालांतराने त्या बसेस बंद पडल्या. पीएमपीने 50, 100, 150, 180 रुपये या प्रमाणे विविध टप्प्यात तिकीट दर निश्चित केले आहेत.

प्रवाशांना बॅगा ठेवण्यासाठी पुरेशी जागा

विमान प्रवाशांना या बसेसची माहिती व्हावी, यासाठी विमानतळ इमारतीमध्ये प्रवाशी ज्या गेटमधून बाहेर पडतात. तिथे एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. त्यात बसचे तपशील असतील. तसेच विमानतळाच्या आवारात सहा ठिकाणी इंग्रजी आणि मराठी भाषेत फ्लेक्स लावण्यात येणार आहेत. बसमध्ये प्रवाशांनना बॅगा ठेवण्यासाठी पुरेशी जागा असेल. विमानतळ सेवेच्या बस प्रवासाची माहिती पीएमपीच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

बसमार्ग व संख्या

विमानतळावरून कोथरुड व पुन्हा विमानतळ -7
विमातळावरून हडपसर ते पुन्हा विमानतळः5
विमानतळावरून हिंजवडी ते पुन्हा विमानतळ -16
विमातळावरून स्वारगेट ते पुन्हा विमानतळ -7
विमानतळावरून निगडी ते पुन्हा विमानतळ -8