PMPML Bus Supply Contractors Strike | अजित पवारांच्या मध्यस्थीनंतर पुण्यातील पीएमपी बस पुरवठादार ठेकेदारांचा संप मागे !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMPML Bus Supply Contractors Strike | पुणे पीएमपीएमएलच्या (Pune PMPML) बस ठेकेदारांनी काल मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारला होता. त्यामुळे पुणेकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पीएमपीएमएलच्या कंत्राटदारांनी (PMPML Contractor) दुपारी संप (Strike) मागे घेतला आहे.

 

पीएमपीएमएलची थकबाकी तातडीने भरण्याचे आदेश अजित पवार यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांना दिले. त्यानंतर पीएमपीएमएलची वाहतूक पूर्ववत झाली. मात्र प्रशासन आणि कंत्राटदारांमधील वादामुळे पुणे आणि पिंपरी – चिंचवड (Pune and Pimpri – Chinchwad) शहरातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

 

पीएमपीएमएलच्या 1400 ते 1500 बस मार्गावर असतात त्यापैकी 650 बस ठेकेदारांच्या आहेत. त्यामध्ये इत्यादी बसचा देखील समावेश आहे. दरम्यान, कर्मचा-यांच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) अथवा इतर कोणतीही सुविधा दिली जात नाही, या पार्श्वभूमीवर ठेकेदारांच्या बस चालकांनी पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा (IAS Laxminarayan Mishra) यांच्याकडे ठेकेदारांबाबत तक्रार दिली होती.

 

दरम्यान, वेतनाच्या प्रश्नाबाबत कंत्राटदार अचानक संपावर गेले.
मात्र त्याचवेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या कमी करून शहरातील बसेसची संख्या वाढवण्यात आली.
दुपारी तीननंतर दोन्ही शहरांची वाहतूक पूर्ववत झाली. अशा घटना पुन्हा घडू नयेत, त्यामुळे भविष्यात पूर्ण काळजी घेतली जाईल.
यासोबतच कंत्राटदारांनाही कडक शब्दात इशारा देण्यात येणार आहे, असं लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितलं.

 

 

Web Title :- PMPML Bus Supply Contractors Strike | PMPML Bus Supply Contractors Strike Updated Ajit Pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा