पीएमपीएमएल मध्ये चोऱ्या करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर आणि परिसरात पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दागिने, मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचे १८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पुणे स्टेशन येथील पीएमपीएमएल बस स्टॉपवर करण्यात आली.

विठ्ठल भागवत मिसाळ (रा. बीड, सध्या रा. भेकराई नगर, हडपसर), अनिल अरुण बोबडे (रा. उल्हासनगर, सध्या रा. कॅम्प पुणे), सुरेश बाबुदास वैष्णव (रा. रायपूर पाली राजस्थान, सध्या रा. वडकी नाला, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बसमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबईल आणि किंमती वस्तू चोरणारी टोळी पुणे स्टेशन परिसरातील बस स्टॉप परिसरात फिरत असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळाली. बंडगार्ड पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरात टोळीचा शोध घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पुणे स्टेशन हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणाहून अनेक ठिकाणी बसेस जात असतात. बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन ही टोळी प्रवाशांच्या खिशातील महागडे मोबईल चोरत होती.

ही कारवाई परिमंडळ -२ चे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक गुन्हे दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे, श्रीधर सानप, सचिन कदम, संतोष पगार, हरीष मोरे, अय्याज दड्डीकर, कैलास डुकरे, निखील जाधव, किरण तळेकर, सागर जगताप, गौरव उभे यांच्या पथकाने केला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like