PMPML e-Bus | पीएमपीएमएलच्या ताफ्यात पुढील काळात फक्त ‘ई – बसेस’चा वापर – विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMPML e-Bus | पीएमपीएमएलच्या ताफ्यात पुढील काळात केवळ ई बसेसच (PMPML e-Bus) सुरू ठेवण्याबाबत विचार सुरू असून नवीन ई बसेस भाडेतत्वावर (e-Bus On Rent) घेण्यासाठी निविदा (Tender) काढण्यात आल्या आहेत.
तसेच येत्या काही दिवसांत शहरातील विविध डेपोंमध्ये चार्जिंग (e-Bus Charging Station) सुविधाही निर्माण करण्यात येणार आहे.
त्याचवेळी अतिरिक्त ठरणार्‍या सीएनजी बसेस (CNG Bus) अन्य महापालिकांना Pune Municipal Corporation (PMC) किंवा आयटी कंपन्यांना (Pune IT Companies) भाडेतत्वावर देण्याबाबतही चर्चा सुरू आहे,
अशी माहिती महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार (PMC Administrator and Commissioner Vikram Kumar) यांनी दिली.

 

याप्रसंगी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनाराण मिश्रा (PMPML CMD Laxminarayan Mishra), अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar) उपस्थित होते.
विक्रम कुमार यांनी सांगितले, की शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये फक्त ई बसेस ठेवण्याबाबतचा विचार करण्यात येत आहे.
यासाठी आणखी ६५० ई बसेस भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन आहे.
नुकतेच सर्व डिझेल बसेस काढून टाकण्यात आल्या असून सीएजनीवर धावणार्‍या बसेस अन्य महापालिका आणि आयटी कंपन्यांना भाडेतत्वावर देण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. (PMPML e-Bus)

 

पीएमपीएमएलचा तोटा कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी देखिल काही डेपोंचा पीपीपी तत्वावर विकास तसेच डेपोच्या जागांमध्ये आयटी कंपनी आणि डेपो असा विकास करण्याच्या दृष्टीनेही विचार करण्यात येत आहे.
जाहिरातीतून उत्पन्न वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरू असून बसमध्ये ई जाहिरात,
बसेस तसेच थांब्यांवरील जाहिरातींचा प्रामुख्याने विचार करण्यात येत आहे.

 

विक्रम कुमार आणखी काय म्हणाले..

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाघोली येथील चार्जिंग स्टेशनचे उदघाटन करण्यात येणार आहे.
याठिकाणी ३५ बसेस चार्जींगची सुविधा करण्यात आली आहे.

सिंहगड किल्ल्यावरही (Sinhagad Fort) वन विभागच्या (Forest Department) सहकार्याने २ बसेस चार्जिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
वन विभागाच्या सहकार्याने किल्ल्यावर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार असून केवळ ई बसेसच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

येत्या महिन्याभरात अप्पर बस डेपो (Upper Bus Depot), पुणे स्टेशन (Pune Railway Station)
येथेही बस चार्जींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

 

 

Web Title :-  PMPML e-Bus | Only e-buses will be used in PMPMLs fleet in future Vikram Kumar Pune Municipal Commissioner and Administrator

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा