PMPML | पीएमपीएमएलच्या संचालकपदावर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष कायम ! वेबसाईटच अपडेट न केल्याने गोंधळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMPML | पुणे महापालिकेमध्ये Pune Municipal Corporation (PMC) प्रशासकाची नियुक्ती होउन दीड महिना उलटला आहे. यासोबतच पीएमपीएमएलच्या (PMPML) संचालक मंडळामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील ‘लोकप्रतिनिधींचे’ संचालकपदही संपुष्टात आले आहे. परंतू यानंतरही महापालिका भवनमधील ‘स्क्रिन’वर माजी लोकप्रतिनिधींची छायाचित्र अद्यापही झळकत असून पीएमपीएमएलच्या वेबसाईटवरही त्यांची ‘छायाचित्र’ अद्यापही कायम असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

 

यंदा महापालिकेच्या निवडणुका लांबल्या आहेत. यामुळे १४ मार्चला नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar ) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरेतर नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते ही पदे देखिल ‘माजी’ झाली आहेत. पीएमपीएमएल च्या संचालक मंडळामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष हे पदसिद्ध म्हणून नियुक्त केले जातात. तर पुणे महापालिकेच्या सभागृहातून एका नगरसेवकाची संचालक म्हणून नियुक्ती केली जाते. नगरसेवक पद संपुष्टात आल्यानंतर संचालकपदही संपुष्टात आले आहे. असे असताना पीएमपीएमएलच्या वेबसाईटस्वर आजही दोन्ही महापालिकांचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच संचालकाचे फोटो झळकत आहेत. (PMPML)

 

यासोबतच महापालिका भवन येथे प्रशासनाच्यावतीने महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी तळ मजल्यावर टीव्ही स्क्रिन बसविण्यात आला आहे. या स्क्रिनवर अद्यापही पदाधिकार्‍यांची उपस्थिती असलेली छायाचित्र आहेत. विशेष असे की मागील दोन वर्षात या स्क्रिनवर नव्याने एकही छायाचित्र अपलोड करण्यात आलेले नाही. एकंदर ‘प्रशासनातील’ अधिकारीच त्या स्क्रिनकडे पाहात नसल्याचे यातून दिसून येते.

Web Title :- PMPML | Mayor, Standing Committee Chairman retained as PMPML Director Confusion not updating website

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

 

Akshaya Tritiya 2022 | श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त मंदिरात फळांची आरास

Ramdas Athawale Adopts Leopard | काय सांगता ! होय, रामदास आठवलेंनी घेतला बिबट्या दत्तक, ठेवलं ‘हे’ खास नाव !

Pune Crime | वाहन चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक, 15 दुचाकी जप्त

MNS Chief Raj Thackeray | ‘…तर रस्त्यावरील संघर्ष पहावा लागेल’, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच मनसेने दिला इशारा

Maharashtra Intelligence Department Alert | गुप्तचर विभागाचा अलर्ट ! परराज्यातील लोक महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात