PMVVY | ‘प्रधानमंत्री वय वंदना योजने’अंतर्गत विवाहितांना मिळणार 18,500 रुपये पेन्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरातील नवविवाहित आणि विवाहित जोडप्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री वय वंदना योजना’ (PMVVY) राबवत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन 4 मे 2017 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. सरकार एलआयसी ही योजना चालवत आहे. या योजनेत नवविवाहितांनी आतापासूनच (PMVVY) जर का पैसे गुंतवणे सुरू केले, तर त्यांना 60 वर्षे वयानंतर 18,500 रुपये पेन्शन मिळू शकते.

 

प्रधानमंत्री वय वंदना योजनेत 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळते. वय वर्ष 60 पेक्षा जास्त वयाचे लोक यात 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. पती-पत्नी दोघेही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. जर दोघांनी वयाच्या 60 व्या वर्षी या योजनेत प्रत्येकी 15 लाख रुपये गुंतवले, तर दोघांनाही 18,500 रुपये महिना पेन्शन मिळू शकेल. पती-पत्नीपैकी एकाने 15 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्यांना 9,250 रुपये मिळतील. (PMVVY)

 

त्यामुळे तुम्हीदेखील विवाहित असाल आणि कुठेतरी म्हातारपणाची सोय करण्यास उत्सुक असाल,
तर लवकरच या योजनेत गुंतवणूक करा आणि म्हातारपणी दरमहा 18,500 रुपये पेन्शन मिळवा.

 

Web Title :- PMVVY | Under the ‘Pradhan Mantri Vaya Vandana Yojana’, married people will get a pension of Rs 18,500

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या