‘बाहुबली’ अतीक अहमदचा भाऊ अशरफला अटक, 1 लाखांचं होतं बक्षीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेशमध्ये गेल्या चोवीस तासांत पोलिस आणि दरोडेखोरांमधील चकमकीच्या बर्‍याच घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान, प्रयागराज येथून पोलिसांनी एक लाखाचे बक्षिस असलेल्या बदमाश अशरफला अटक केली आहे. वास्तविक, उत्तर प्रदेशच्या बाहुबली अतीक अहमदचा भाऊ याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली आहे. खालिद अझीम उर्फ अशरफ याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. माजी खासदार आणि बसपचे आमदार राजू पाल यांच्या हत्येप्रकरणी अशरफ याला अटक करण्यात आली आहे. अशरफ याच्यावरही एक लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये अशरफ याच्या विरोधात एकूण 30 प्रकरणांची नोंद आहेत. कॅन्ट स्टेशनमध्ये पोलिस अशरफची चौकशी करत आहेत. त्यावेळी बसपाचे आमदार राजू पाल यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी खासदार अतीक अहमद आणि त्याचा धाकटा भाऊ माजी आमदार अशरफ ऊर्फ खालिद अझीम यांच्यासह दहा जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अशरफ फरार होता.

फक्त प्रयागराजच नव्हे तर उत्तर प्रदेशातही आदल्या रात्री इतर अनेक जिल्ह्यात पोलिस आणि गुन्हेगार यांच्यात चकमकी झाली. ज्यामध्ये पोलिसांना काही चकमकींमध्येही यश मिळाले. यातील एक चकमकी कानपूरमध्ये घडली जेव्हा पोलिस एका हिस्ट्रीशीटरला पकडण्यासाठी पोहोचले. या चकमकीत 8 पोलिस शहीद झाले आहेत, या घटनेनंतर संपूर्ण प्रशासन हादरले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या संदर्भात कठोर भूमिका घेत त्वरित ठोस कारवाई करण्यास सांगितले आहे.