चाकूच्या धाकाने कार चोरणारे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चाकूचा धाक दाखवत कार चोरून नेणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. तर कार, रिक्षा, दोन मोटार सायकल असा 1 लाख 60 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

शाहरूक शौकत खान (वय २५), विशाल नानासाहेब आव्हाड (वय १९, दोघेही रा. रा. कृष्णनगर, महंम्मदवाडी )अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

उंड्री परिसरात (दि. १७ फेब्रुवारी) चार दिवसापूर्वी भरदिवसा दुचाकीस्वार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून कार चोरुन नेली होती. याप्रकरणी अक्षय खुडे (वय २५, रा. येवलेवाडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार दुचाकीवरील दोघांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा कोंढवा पोलिस समांतर तपास करत होते. कोंढवा पोलिस ठाण्याचे तपास पथकातील ज्योतिबा पवार, अमित साळुंखे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यातील आरोपी रेकॉर्डवरील असल्याचे समजले. त्या आरोपीचे फोटो दाखविल्यानंतर तो आव्हाड असून त्यानेच खान याच्या मदतीने ही कार चोरून नेल्याचे समोर आले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन मोरे यांच्या पथकाने आव्हाड याला पकडले. त्याच्याकडे तपास केल्यानंतर खान याला पकडण्यात आले. त्यांनीच ही कार चोरल्याचे निष्पन्न झाले. तसेच, त्यांनी परिसरात केलेले वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे.

You might also like